‘एकीकरण समितीचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या’ - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:29 AM2018-04-01T01:29:45+5:302018-04-01T01:29:45+5:30
बेळगावसह सीमाभागाच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सर्व ताकदीनिशी आम्ही लढत आहोत. याबरोबरच या प्रश्नी सीमाभातील मराठी जनतेची साथ हवी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे जास्तीत जास्त संख्येने आमदार निवडून द्यावेत, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
बेळगाव : बेळगावसह सीमाभागाच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सर्व ताकदीनिशी आम्ही लढत आहोत. याबरोबरच या प्रश्नी सीमाभातील मराठी जनतेची साथ हवी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे जास्तीत जास्त संख्येने आमदार निवडून द्यावेत, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
बेळगाव येथील सी. पी. एड. मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार निवेदिता माने, कॉ. कृष्णा मेणसे, किरण ठाकूर, धैर्यशील माने, उपमहापौर मधुश्री पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, बेळगावात एकीकरण समितीचे महापौर, उपमहापौर निवडून येतात. हे सर्वजण एकदिलाने काम करत मराठी भाषिकांच्या हिताची जपणूक करत आहेत. सीमाप्रश्नी माझा सर्वांशी सुसंवाद आहे. महाराष्ट्राच्या जनतेसह देशपातळीवर सीमाप्रश्न सुटावा अशी भावना आहे. सीमाप्रश्न बेळगावपुरता मर्यादित नाही, तर मी बिदर, भालकीचा देखील विचार करतो. आगामी निवडणुका हा या सगळ्याचा शेवटचा टप्पा आहे.
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, शरद पवार यांनी हरीश साळवे यांच्यासारखे निष्णात वकील देऊन न्यायालयाच्या कामकाजात बळकटी दिली आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या प्रश्नाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी वाटचाल सुरू आहे. समस्त सीमा भाग पवारांच्या योगदानानबद्दल कायम ऋणी
असेल.