ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी झिंबाब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. झिंबाब्वे दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय संघात मधल्या फळीत फलंदाज म्हणून ३० वर्षीय फैज फजलची निवड करुन संदिप पाटिल यांच्या निवडसमीतीने सर्वांना अश्चर्याचा धक्काच दिला आहे. फैज फजल हा मुळचा नागपूरमधील आहे. सध्या तो कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी परदेशात गेला आहे. भारतीय संघात निवड झाल्याने त्याला देखिल आश्चर्य वाटले असेल. फैज फजलची भारतीय संघातील निवडीमुळे त्याच्या घरात सध्या आनंदाचे वातावरन निर्माण झाले आहे. विदर्भातील उमेश यादवने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विदर्भातील फजलची भारतीय संघात निवड झाल्यामुळे नागपूरकरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. फजल हा डाव्या हाताने फलंदाजी करतो. एकप्रकारे असेचं म्हणता येईल मधल्या फळीत सुरेश रैनाच्या जागी त्याची निवड झाली आहे.
आपल्या लाडक्या मुलाची भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद फजलच्या आई-वडिलांनी पेढे वाटून साजरा केला. क्रिकेट खेळायला सुरु केल्यानंतर प्रत्येकाचे एकचं स्वप्न असते, ते म्हणजे भारतीय संघात निवड होण्याचे. फजलने १३ वर्ष रणजी आणि आयपीएलचे सामने खेळल्यानंतर आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याची वर्णी लागली आहे.
फैज फजलच्या कामगीरीवर एक नजर -
७ सप्टेबर १९८५ रोजी नागपूर येथे फैज फजलचा जन्म झाला. लहानपनापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या फजलने २००३ मध्ये प्रथम विदर्भ संघाकडून खेळण्यास सुरवात केली.२००९ मध्ये विदर्भ संघ सोडून त्याने रेल्वे कडून खेळण्यास सुरवात केली. २०१२ पर्यंत तो रेल्वेच्या संघाकडून खेळला. यादरम्यान २००९-११ च्या दरम्यान IPL मध्ये त्याने राज्यस्थान रॉयल संघाचे नेतृत्व केले. त्याच प्रमाणे इंडिया रेड, अंडर १९ संघात ही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
प्रथम श्रेणीच्या ७८ सामन्यात ३९. ५८ च्या सरासरीने ५१८६ धावा केल्या आहेत. यामध्ये १० शतकाचा आणइ २७ अर्धशतकाचा समावेश आहे. तर २०० धावांची खेळी ही त्याची सर्वेत्म खेळी आहे. यादरम्यान त्याने २० विकेट देखिल पटकावल्या आहेत. ७५ झेल त्याने घेतले आहेत.
लिस्ट ए च्या ६४ सामन्यात ३४.५२च्या सरासरीने २०३७ धावा केल्या आहेत. यात ५ शतक तर १३ अर्धशतकाचा समावेश आहे. १२९ ही सर्वेतम केळी आहे. T20 च्या ४८ सामन्यात २०.३६ च्या सरासरीने ८९६ धावा केल्या आहेत. ३ वेळा त्याने अर्धशतके केली आहे. ६६ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्म खेळी आहे.
भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. तर, विडींज दौऱ्यात भारत चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका जुलै व ऑगस्टमध्ये खेळविली जाणार आहे.
झिंबाब्वे दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के. एल. राहुल, फैज फजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरींदर सरन, मनप्रीत सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल.
भारतीय संघ ११ - २२ जूनच्या दरम्यान झिम्बाब्वेमध्ये तीन वन डे आणि दोन ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक
११ जून – पहिला वन डे सामना
१३ जून – दुसरा वन डे सामना
१५ जून – तिसरा वन डे सामना
१८ जून – पहिला टी ट्वेण्टी सामना
२० जून – दुसरा टी ट्वेण्टी सामना
२२ जून – तिसरा टी ट्वेण्टी सामना
Web Title: Selecting one-day squad of Nagpur player Faiz Fazal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.