दोन मयत शिवसैनिकांची पदाधिकारी म्हणून निवड; मीरा भाईंदर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 10:07 PM2022-07-04T22:07:45+5:302022-07-04T22:08:18+5:30

आ. सरनाईक हे संपर्कप्रमुख असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या शिफारसी प्रमाणे होत होती. काही महिन्यांपूर्वी भाईंदर पश्चिम शाखेत सेनेच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यात राडा झाल्या नंतर संपूर्ण शहराची शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. 

Selection of two dead Shiv Sainiks as leaders; Mira Bhayander Shiv Sena's announces jumbo leader commitee | दोन मयत शिवसैनिकांची पदाधिकारी म्हणून निवड; मीरा भाईंदर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

दोन मयत शिवसैनिकांची पदाधिकारी म्हणून निवड; मीरा भाईंदर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

Next

मीरारोड -  एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे चित्र असताना  मीरा भाईंदर शिवसेनेची जम्बो कार्यकारणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी कार्यकारणी बरखास्त करायला लावली होती. तर नव्या जम्बो कार्यकारिणीत असलेल्या दोन पदाधिकाऱ्यांचे पूर्वीच निधन झाले असताना त्यांची नावे यादीत आल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. 

आ. सरनाईक हे संपर्कप्रमुख असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या शिफारसी प्रमाणे होत होती. काही महिन्यांपूर्वी भाईंदर पश्चिम शाखेत सेनेच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यात राडा झाल्या नंतर संपूर्ण शहराची शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. 

तर शिंदे यांच्या बंडात आ. सरनाईक देखील सहभागी झाले. त्यामुळे शहरातील बहुसंख्य नगरसेवक व माजी सेना पदाधिकारी, शिवसैनिक मात्र ठाकरे यांच्या सोबत असल्याचे दिसून आले.  मातोश्रीवर स्वतः उद्धव ठाकरे यांनी सेना नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केल्या नंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने ठाकरें सोबत असल्याचे चित्र आहे. त्यातूनच शिवसेनेची आज सोमवारी प्रसिद्ध झालेली जम्बो कार्यकारणी चर्चेचा विषय ठरली आहे. 

दरम्यान आजच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या यादीतील दोन पदाधिकाऱ्यांचे पूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून विरोधकांकडून टीका होत आहे. प्रभाग १० मधील पदाधिकाऱ्यांच्या यादीत उपविभाग प्रमुख म्हणून नेमलेले प्रकाश मोरे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर प्रभाग ३ मध्ये उपविभाग प्रमुख नेमलेले भास्कर रोडे यांचे गेल्या वर्षी कोरोना काळात निधन झाले आहे. 

तर सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या पूर्वीच्या याद्या आणि नव्याने तयार केलेली यादी एकत्र पाठवण्यात आली होती.  जेणे करून निधन झालेल्या मोरे व रोडे ह्या कडवट शिवसैनिकांची नावे यादीत प्रसिद्ध झाली असून ती दुरुस्ती केली आहे. परंतु त्या दोन्ही शिवसैनिकांना शिवसेना विसरू शकत नाही असे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे म्हणाले. 

Web Title: Selection of two dead Shiv Sainiks as leaders; Mira Bhayander Shiv Sena's announces jumbo leader commitee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.