स्वतंत्र विदर्भासाठी आत्मक्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:01 AM2018-10-03T00:01:03+5:302018-10-03T00:01:38+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी मंगळवारी येथील तिरंगा चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी मंगळवारी येथील तिरंगा चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देण्यात आला आहे.
वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोेलन समितीने लढा उभारला आहे. मंगळवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून तिरंगा चौकात सामूहिक आत्मक्लेश आणि उपोषण केले. आपण सत्तेत आल्यास विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात सत्तेचा काळ संपत आला. अजूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. विदर्भातील जनतेची सरकारने फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मतपेटीतून त्याचे उत्तर जनता देईल, असे सांगत शांततेच्या मार्गाने मंगळवारी सरकार विरोधात आत्मक्लेश केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, कोअर कमिटी सदस्य हेमंत मुदलीयार, महासचिव डॉ. विजय चाफले, दत्ता चांदोरे, प्रदीप धामणकर, निखिल खरोडे, वैभव चिळवे, जयंत बापट, सोनाली मरघडे, जितेंद्र हिंगासपुरे आदी उपस्थित होते.