भाजपचे २०१९ साठी स्वबळाचे उद्दिष्ट

By admin | Published: May 4, 2017 01:16 AM2017-05-04T01:16:04+5:302017-05-04T01:16:04+5:30

चंद्रकांतदादा पाटील; इशारे, धमकी, नोटीस काही नको; कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

Self-motive for BJP's 2019 | भाजपचे २०१९ साठी स्वबळाचे उद्दिष्ट

भाजपचे २०१९ साठी स्वबळाचे उद्दिष्ट

Next

कोल्हापूर : सत्तेत राहून शिवसेनेचे इशारे देणे, धमक्या देणे सुरू आहे. नोटीस पीरियड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच २०१९ ला कोणत्याही परिस्थितीत देशात ४०० खासदार आणि महाराष्ट्रात १४४ आमदार हे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. त्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; म्हणून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे स्पष्ट आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
कोल्हापूर महानगरच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बुधवारी ते बोलत होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी आगामी दोन वर्षांतील भाजपचा नियोजित आराखडा मांडला.
पाटील म्हणाले, २०१९ ची तयारी आता सुरू झाली आहे. केंद्रामध्ये आम्ही आणि मित्रपक्ष मिळून ३३८ आहोत; परंतु काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ४०० खासदार ह्यकमळह्ण चिन्हावरील हवेत. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातही मित्रपक्षांसह आपल्याकडे १३७ आमदार आहेत. शिवसेनेची त्यामुळे मदत घ्यावी लागली. त्यामुळे स्थिर आणि शांततेत राज्य चालण्यासाठी भाजपचे १४४ आमदार आणि मित्रपक्षासह १७० आमदारांचे ध्येय आम्ही ठेवले आहे. हे यश मिळाल्यानंतर मग कुणाचे इशारे चालणार नाहीत. आम्ही दोघा-तिघांनी याबाबतचे सर्व गणित मांडले आहे. त्यामुळे एक आणि एक जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
आमदार सुरेश हाळवणकर, संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार अमल महाडिक, पुणे ह्यम्हाडाह्णचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, बाबा देसाई यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.


मित्रपक्षांनाही घेणार सोबत
चंद्रकांतदादा म्हणाले की, २०१९ लाही मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत. राज्यात भाजपचे १४४ आमदार आणि मित्रपक्षांसह १७० आमदारांचे उद्दिष्ट आहे. माझी तर स्वच्छ भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठक गुप्त कुठे असते? मित्रपक्षांचे ज्या प्रमाणात आमदार असतील, त्या प्रमाणात त्यांना मंत्रिपदे द्यायची. त्यांचे चार मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला येऊन बसले म्हणून बिघडत नाही; परंतु रोज उठून कुणाचे इशारे चालणार नाहीत.

भाषणातून माझा उदो उदो नको
यापुढच्या काळात कोणीही भाषणात माझा उदो उदो करू नये. मी माझ्या राज्यासाठी, पक्षासाठी, लोकांसाठी, समाधानासाठी काम करतो. करायचीच असेल तर भगव्याची, पक्षाची स्तुती करा. माझी नको. तसे कराल तर तुमचे गुण प्लस न होता मायनस होतील, हे लक्षात घ्या, असा दमच यावेळी चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना भरला.

अमित शहा तीन दिवस महाराष्ट्रात
पाटील म्हणाले, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देशभरात फिरण्यासाठी ७५ दिवसांचे नियोजन केले आहे. त्यातील १६ ते १८ मे असे तीन दिवस ते महाराष्ट्रात असतील. मुख्यमंत्री आणि मी पक्षासाठी १५ दिवस देणार आहोत. नितीन गडकरी यांचा २७ मे रोजी नागपूरला सत्कार आहे. त्यानंतर तीन दिवस आपण त्या विभागात पक्षकार्यासाठी फिरणार आहोत.


 

Web Title: Self-motive for BJP's 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.