सेल्फी महत्वाची की सेफ्टी ?

By admin | Published: July 12, 2017 10:18 PM2017-07-12T22:18:10+5:302017-07-12T22:18:10+5:30

निसर्ग सौदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यात हलक्या हलक्या पाऊसच्या सरी कोसळू लागताच निसर्ग प्रेमी लोकांचे पाय तालुक्यातील माळशेज घाट

Selfie important safety? | सेल्फी महत्वाची की सेफ्टी ?

सेल्फी महत्वाची की सेफ्टी ?

Next
>आनंद कांबळे/ ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 -  निसर्ग सौदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यात हलक्या हलक्या पाऊसच्या सरी कोसळू लागताच निसर्ग प्रेमी लोकांचे पाय तालुक्यातील माळशेज घाट  जीवधन चावंड हडसर निमगिरी यांसारखे किल्ले व नाणेघाट आंबोली परिसर यासारख्या ठिकाणी वळतात.
 
अलीकडच्या काळात पावसाळ्यात माळशेज घाटात झालेल्या दुर्घटना पाहता पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर नाणेघाट व परिसारकडे दिसतो या पर्यटकांमध्ये शहरी पर्यटकांची संख्या जास्त असते नानेघाटातील नानाचा अंगठा व रिव्हर्स पॉईंट पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत
 
या ठिकाणी वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यात स्वतःला सोशल मीडियावर अपडेट करण्यासाठी या ठिकाणी सर्रास सेल्फी काढण्याचे प्रकार चालू असतात
 
नानाचा अंगठा रिव्हर्स पॉईन्ट या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी सेल्फी काढणे अतिशय धोकादायक आहे एका बाजूने असणारी खोल दरी मुसळदार पाऊस जोराचा वारा निसरडी जागा अशा प्रतिकूल परिस्थितीत सेल्फीसाठी चढाओढ सुरु असते
 
यातून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने याठिकाणी संरक्षक कठडे बसवावेत आणि याठिकानाला नो सेल्फी झोन घोषित करावे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
 
जुन्नर तालुक्याला छत्रपती शिवरायांचा जसा ईतिहास आहे तसाच जुन्नर तालुका निसर्ग सौंदर्याने सुद्धा ओतप्रोत भरलेला व नटलेला आहे. या व ईतर कारणांमुळे महाराष्ट्रातील पर्यटक गेली ४/५ वर्षांपासून जुन्नरकडे आकर्षित झाला आहे. पावसाळा व हीवाळा या ऋतूत विशेषत: पर्यटकांचा ओघ माळशेज घाट,भैरवगड,हरिश्चंद्रगड, पिंपळगाव जोगा धरण परीसर,किल्ले शिंदोळा,हटकेश्वर, शिवनेरी, लेण्याद्री व ईतर अनेक लेणी समूह,किल्ले हडसर,किल्ले चावंड, कुकडेश्वर,किल्ले जिवधन, सातवाहन कालीन नाणेघाट(सुमारे २२०० ते २३०० वर्षापूर्विचा ),दार्याघाट व अंबोली परिसरातील धबधबे, किल्ले नारायणगड,ओझर, चैतन्य महाराज(तुकाराम महाराजांचे गुरू)यांची ओतूर येथील समाधी मंदिर, गुप्त विठोबा मंदिर,आणे घाटातील नैसर्गिक पुल ई.निसर्गरम्य, ऐतिहासिक व अध्यात्मिक स्थळांना भेट देण्यासाठी वाढू लागला आहे.ही बाब जुन्नर तालुका पर्यटनासाठी निश्चितच चांगली आहे.
पण निसर्ग, गड-किल्ले, विविध जलाशय(तालुक्यात५ जलाशय आहेत) या स्थळांना भेट देणार्या सर्वच पर्यटकांमध्ये निसर्गाचा आनंद अनुभवणे,ऐतिहासिक वारसा जाणून घेणे, पर्यावरणाविषयी जागृती या गोष्टी असतीलच असे नाही.
जुन्नर तालुक्यात पर्यटक म्हणून येताय... आपले स्वागतच आहे.पण काही गोष्टींची खबरदारी व स्वतःच्या जीवाची काळजी मात्र घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला मोबाईल मधे फोटो(सेल्फी) काढण्याचा मोह आवरत नाही. जरूर सेल्फी वा ग्रुप फोटो आठवणी जपण्यासाठी काढले पाहिजेत परंतू त्यासाठी योग्य स्थान निवडणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा ती सेल्फी तुमची अंतिम सेल्फी ठरल्याशिवाय राहणार नाही.विशेषतः कोणत्याही किल्ल्यावर जात असताना हा सेल्फी मोह खास ऊसळून येतो.गडाच्या तटबंदीवर, बांधकामांवर तसेच अवशेषांवर चढून व कड्यालगत जाऊन फोटो न काढलेलाच बरा .कारण पावसाळ्यात तटबंदी, बुरुज,ईमारतींचे अवशेष ढासळण्याची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी तुमच्या सेल्फीप्रेमाने अपघात होऊ शकतो पण हा अपघात केवळ तुमच्याच जीवावर बेततो एवढेच नाही तर त्या ऐतिहासिक वास्तूची सुद्धा पडझड होते.

Web Title: Selfie important safety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.