‘सेल्फी’चा नाद जडतोय !
By admin | Published: January 10, 2016 01:42 AM2016-01-10T01:42:44+5:302016-01-10T01:42:44+5:30
बस थांबा, रेल्वे स्टेशन, रस्ता, समुद्रकिनारा, कॉलेज कॅम्पस असे कोणतेही ठिकाण असले तरीही त्या ठिकाणी ‘सेल्फी’ काढला जातो. तरुणांमध्ये सेल्फीची क्रेझ जास्त आहे. वरकरणी हे वागणे
मुंबई : बस थांबा, रेल्वे स्टेशन, रस्ता, समुद्रकिनारा, कॉलेज कॅम्पस असे कोणतेही ठिकाण असले तरीही त्या ठिकाणी ‘सेल्फी’ काढला जातो. तरुणांमध्ये सेल्फीची क्रेझ जास्त आहे. वरकरणी हे वागणे सामान्य वाटत असले तरीही सतत सेल्फी काढणे हा एक मानसिक आजार आहे.
जून २०१५मध्ये अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सतत सेल्फी काढणे हा मानसिक आजार असल्याचे जाहीर केले आहे. या आजाराला ‘सेल्फायटिस’ असे वैद्यकीय भाषेत संबोधिले जाते. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे सेल्फी काढण्याच्या नादात एका कॉलेज तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. यानंतर पुन्हा एकदा सेल्फी हा विषय प्रकाशझोतात आला. अनेकांचे पालक पाल्यांना ‘सेल्फी’मुळे ओरडत असतात. पालकांचे हे वागणे बरोबर आहे. सेल्फीच्या आहारी गेल्यास मानसिक आजार जडू शकतो, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.
जी.टी.मधील मानसोपचार विभागात दोन तरुणींवर ‘सेल्फायटिस’ या मानसिक आजारासाठी गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. या तरुणी दिवसातून किमान ५ वेळा सेल्फी काढायच्या. त्यातले काही सेल्फी त्या सोशल नेटवर्किंग साईटवर टाकायच्या. आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्या दिवसाला दोन सेल्फी काढतात, असे डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. वर्षभरात जगभरात १२ जणांचा मृृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे. कारण, अनेकांना सेल्फी काढताना
आपण कुठे आहोत, आजूबाजूला कोण आहे, आपण कुठच्या परिस्थितीत आहोत याचे भान राहत नाही. त्यामुळे असे अपघात होतात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘सेल्फायटिस’ कसा ओळखावा?
स्मार्टफोन्समुळे एका क्लिकवर अनेक गोष्टी उपलब्ध होतात. त्यामुळे कामाच्या निमित्ताने स्मार्टफोन्स उपयोगी आहेत; पण, त्याचबरोबर दुष्परिणाम दिसायला लागले आहेत.
स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरा असतो. त्यामुळे स्वत:च फोटो काढण्याची क्रेझ पसरली आहे. सतत अशा प्रकारे सेल्फी काढणे.
हे सेल्फी फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करणे याचे व्यसन अनेकांना जडले आहे. यालाच वैद्यकीय भाषेत ‘सेल्फायटिस’ असे म्हणतात.
फोटो काढण्याचा छंद असणे
ही वेगळी गोष्ट आहे. पण, सतत सेल्फी काढणे म्हणजे त्याच्या आहारी जाणे हा मानसिक आजार आहे. त्यामुळे सर्वांनीच स्वत:वर नियंत्रण ठेवणे हा सर्वाेत्तम उपाय असल्याचे
डॉ. मुंदडा यांनी सांगितले.
‘सेल्फायटिस’ कसा ओळखावा?
‘आठवणी फोटो रूपात साठवणे’ ही मानवी प्रवृत्ती आहे. पण, प्रत्येक आठवण अथवा गोष्ट, कार्यक्रम फोटो रूपात साठवून ठेवणे म्हणजे हे एक प्रकारचे व्यसनच आहे.
स्मार्टफोन्समुळे ‘सेल्फायटिस’ हा नवीन मानसिक आजार तरुणांना जडतो आहे. या आजाराची लक्षणे
एका दिवसात कमीतकमी तीन सेल्फी काढणे. पण, हे फोटो कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट न करणे
एका दिवसात कमीतकमी
तीन अथवा जास्त सेल्फी काढणे; आणि सर्व फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करणे
दिवसातून कमीतकमी
६ सेल्फी काढणे; आणि हे
सर्व फोटो लगेचच सोशल नेटवर्किंग साईटवर टाकणे