दारुची बेभाव विक्री!

By admin | Published: February 9, 2015 12:59 AM2015-02-09T00:59:00+5:302015-02-09T00:59:00+5:30

प्रत्येक वस्तूंसह दारूच्या किमती सुद्धा या निश्चित असतात. दारूच्या बॉटलवर एमआरपीसुद्धा असते. परंतु सद्यस्थितीत उपराजधानीतील तब्बल

Selling of alcohol is unnecessarily! | दारुची बेभाव विक्री!

दारुची बेभाव विक्री!

Next

ग्राहकांची लूट : अबकारी विभाग व पोलिसांची भूमिका संशयास्पद
विहंग सालगट/योगेंद्र शंभरकर - नागपूर
प्रत्येक वस्तूंसह दारूच्या किमती सुद्धा या निश्चित असतात. दारूच्या बॉटलवर
एमआरपीसुद्धा असते. परंतु सद्यस्थितीत उपराजधानीतील तब्बल ९० टक्के दारूच्या दुकानांमध्ये एमआरपीपेक्षा ३० ते ५० रुपये जास्त किमतीवर दारू विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती अबकारी विभाग व पोलिसांनाही आहे. तरीही कारवाई होत नसल्याने त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यात सामान्य ग्राहकांची मात्र लूट सुरू आहे. दारू विक्रेत्यांचा हा मनमानी प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारा कॅमेऱ्यात कैद केला आहे.
९० टक्के दुकानात अधिक किंमत
शहरात देशी दारूच्या दुकानांसह ११६ विदेशी दारूची दुकाने आणि १०४ बीअर शॉप आहेत. लोकमतच्या चमूने काही दिवसांपूर्वी शहरातील प्रत्येक क्षेत्रातील दारूच्या दुकानामध्ये आपल्या प्रतिनिधीला ग्राहक बनवून पाठवून दारू विकत घेण्याचा प्रयत्न केला. जवळपास ९० टक्के दुकानदारांनी एमआरपीपेक्षा अधिक किंमत सांगितली. आपच्या प्रतिनिधीने जेव्हा याचे कारण विचारले तेव्हा काही जणांनी उत्तर देण्याचे टाळले तर काहींनी लाभ आणि सेटिंगमध्ये अधिक खर्च होत असल्याची कबुली दिली. एका दुकानदाराने तर सांगितले की, पोलिसांपासून तर अबकारी विभागातील अधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतात. आपल्या खिशातून तर देणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडूनच वसूल करावे लागतात.
गिरीश वॉईन शॉप, जरीपटका
जरीपटका मुख्य बाजार परिसरातील गिरीश वाईन शॉपवर जेव्हा आमचे प्रतिनिधीने गेले तेव्हा दोन अल्पवयीन मुलं दारू विकत घेत होती. नियमानुसार अल्पवयीन मुलांना दारू विकता येत नाही. असे असतानाही दोन्ही अल्पवयीन मुले दुकानातून दारूची बॉटल विकत घेऊन गेले. या संपूर्ण घटनेला आमच्या प्रतिनिधीने कॅमेऱ्यात कैद केले. यानंतर १०४ रुपये एमआरपी असलेली ‘रम’ची बॉटल मागितली तेव्हा १२० रुपये मागण्यात आले. याबाबत विचारणा केली असता हीच किंमत असल्याचे सांगण्यात आले.
राजेश वाईन शॉप, कमाल चौक
कमाल चौकातील राजेश वाईन शॉपर जेव्हा आमच्या प्रतिनिधीने रमची बॉटल मागितली तेव्हा सुद्धा १०४ रुपये एमआरपी नोंदवलेली होती. परंतु दुकानदाराने मात्र ११० रुपये मागितले. दुकानदाराला एमआरपी दाखविली तेव्हा आम्ही ११० रुपयेच घेतो बाकीचे १२० रुपये घेतात. काही दिवसानंतर आम्ही सुद्धा १२० रुपयेच घेऊ, असे उत्तर दिले.
मनीष वाईन शॉप वर्धा रोड
वर्धा रोडवरील मनीष वाईन शॉपमध्ये आमच्या प्रतिनिधीने ११० रुपये किमतीची रेड रमची बॉटल मागितली असता दुकानदाराने त्याचा भाव १२५ रुपये सांगितला. कारण विचारले असता तोंड फिरवले. घ्यायचे असेल तर घ्या नाही तर नको घ्या, असेही सुनावले.
तनवान वाईन्स, नारा रिंग रोड
नारा रिंग रोड चौकात तनवान वाईन शॉपवर जेव्हा आमच्या प्रतिनिधीने १८० एमएलची रम मागितली तेव्हा काऊंटरवर बसलेल्या तरुणाने १२० रुपये मागितले. बॉटलवर मात्र १०४ रुपये लिहिले होते. तेव्हा दुकानदाराने सांगितले की, सगळीकडे १२० रुपयेच भाव आहे.
मून बीअर शॉप, मनीषनगर
येथे आमच्या प्रतिनिधीने १७० रुपयाच्या एमआरपीची बीअर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने यासाठी २०० रुपये मागितले. अगोदर सांगितले की, चिल्ड करण्यासाठी अधिकची किंमत आहे. नंतर सांगितले की परवाना शुल्क ८५ हजार रुपये होते. आता ते २ लाख १० हजार रुपये झाले आहे. त्यामुळे फारसा लाभ होत नाही. वरून पोलीस आणि अबकारी विभागाचे इन्स्पेक्टर सुद्धा येतात. त्यांनाही काही रक्कम द्यावी लागते.

Web Title: Selling of alcohol is unnecessarily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.