बेकायदा सीमकार्ड विक्री; नेपाळींसह तिघे अटकेत
By admin | Published: January 7, 2015 10:28 PM2015-01-07T22:28:02+5:302015-01-07T23:52:59+5:30
विदेशींना मोबाइल सीमकार्ड दिल्याप्रकरणी
रत्नागिरी : वास्तव्याचा पुरावा व अन्य आवश्यक कागदपत्र न घेताच विदेशींना मोबाइल सीमकार्ड दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने दोन नेपाळी व विक्रेत्यासह तिघांना काल रात्री अटक केली. स्वरुप प्रकाश हर्डीकर (कशेळी, राजापूर) असे विके्रत्याचे नाव असून, योगेश बहादूर बोरा व रवींद्र बहादूर धामी अशी दोन्ही नेपाळींची नावे आहेत. या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विक्रेता स्वरूप हर्डीकर याने रत्नागिरी पावस मार्गावर एका टपरीवर एका कंपनीची सीमकार्ड विक्री सुरू केली होती. रत्नागिरीतीलच एका मोबाईल दुकानात तो आधी काम करायचा. त्यानंतर त्याने स्वत: टपरीसारखे दुकान थाटून रत्नागिरी - पावस मार्गावर सीमकाडर््सची विक्री सुरू केली. घटना उघडकीस येईपर्यंत त्याने ४४ सीमकाडर््सची विक्री केली. मात्र, त्यातील दोघांना वास्तव्याची कागदपत्र नसताना सीमकार्ड दिल्याने कायद्याचा भंग झाला. त्यामुळे दोन्ही नेपाळींना अटक करण्यात आली. आज या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही जामीन मंजूर झाला. मात्र, स्वरूप हर्डीकर याने जामीन सादर केल्याने त्याची सुटका झाली. परंतु दोन्ही नेपाळींना जामीन देणे शक्य न झाल्याने ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जावसेन अधिक तपास करत आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसात सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळे सीमकार्ड्स विके्रत्यांकडे पोलिसांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
वास्तव्याचा पुरावा व अन्य आवश्यक कागदपत्र न घेताच विदेशींना मोबाइल सीमकार्ड दिल्याचे उघड.
आरोपीने केली होती रत्नागिरी पावस मार्गावर एका टपरीवर एका कंपनीची सीमकार्ड विक्री सुरू.
विक्रेत्याची जामीनावर सुटका.