पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत
By admin | Published: May 18, 2016 01:16 AM2016-05-18T01:16:42+5:302016-05-18T01:16:42+5:30
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात पालेभाज्यांच्या आवकेत घट झाली आहे
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात पालेभाज्यांच्या आवकेत घट झाली आहे. बाजारभाव तेजीत होते. टोमॅटो, मिरची, कारली, भेंडी, दोडका यांची आवक स्थिर असून, बाजारभाव तेजीत आहेत. भुसार मालाच्या आवकेत घट झाली असून, बाजारभाव तेजीत आहेत. दौंड तालुक्यात लिंबांच्या आवकेत घट झाली आहे, बाजारभाव स्थिर आहेत. भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांची आवक स्थिर झाली, बाजारभाव स्थिर आहेत. मेथी व कोथिंबीर यांची आवक स्थिर आहे, बाजारभावात वाढ झाली, अशी माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची
आवक (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (२६) ८०-२००, वांगी (३१) ५०-१२०, दोडका (६) १००-२५०, भेंडी (२८) १००-३५०, कारली (५) २००-६००, हिरवी मिरची (१८) ४०० ते ८५०, भोपळा (३५) ४० ते ८०, काकडी (३८) ६० ते १२०, काकडी (३८) ६० ते १२०, कोथिंबीर (६,८२० जुड्या) ४०० ते १०००, मेथी (२,३४० जुड्या) ४५०-८००.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफएक्यू) (१६३) १६१४ ते २२००, ज्वारी (१०) १७५१ ते २५००, बाजरी (३) १७५१ ते २५००, हरभरा (३) ५३०० ते ५५००, तूर (५) २३००, लिंबू (११) ८००-१४००.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (३३६) १६०० ते २१००, ज्वारी (१०८५) १८५१ ते २६०१, बाजरी (८७) १६५१ ते २४०१, हरभरा (९०) ५८०० ते ५५२५, मका (४०) १३५० ते १५५०, लिंबू (२१) ७०१-१६१०, चवळी (२१) ७८०० ते ८२००.
पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (१३) १५५१ ते १९००, ज्वारी (८) २२०० ते २४११, बाजरी (२३) १६११ ते २३५१, हरभरा (४) ५१५१ ते ५२५१, मका (६) १४२५ ते १४५१.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (३१) १५८१ ते २३११, ज्वारी (१३) १५२१ ते २४२५, बाजरी (२८) १६०१ ते २४००, हरभरा (४) ५२०१ ते ५४११, लिंबू (१५) १००१ ते १८५०.(वार्ताहर)