तीन हजार कोटींचे रोखे विकणार
By Admin | Published: October 22, 2016 01:43 AM2016-10-22T01:43:07+5:302016-10-22T01:43:07+5:30
महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे तीन हजार कोटी रुपयांचे विकास रोखे विक्रीस काढले असून, या कर्जरोख्यातून मिळालेली रक्कम विकासविषयक कामांवर खर्च करण्यात
मुंबई : महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे तीन हजार कोटी रुपयांचे विकास रोखे विक्रीस काढले असून, या कर्जरोख्यातून मिळालेली रक्कम विकासविषयक कामांवर खर्च करण्यात येणार आहे. कर्जरोखे काढून विकासकामे करण्याची या सरकारची ही तिसरी वेळ आहे.
अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) अधिसूचित केलेल्या कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम वैयक्तिक, संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येणार आहे. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात २५ आॅक्टोबर रोजी हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दर साल दर शेकडा कुपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २६ एप्रिल आणि २६ आॅक्टोबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येणार असून, हे रोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असणार आहेत, असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)