सेनेचा शिव जलक्रांती उपक्रम

By admin | Published: August 19, 2015 01:02 AM2015-08-19T01:02:21+5:302015-08-19T01:02:21+5:30

जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण उर्वरित गावांनाही न्याय मिळण्याच्या हेतूने

Sena's Shiv javakranti venture | सेनेचा शिव जलक्रांती उपक्रम

सेनेचा शिव जलक्रांती उपक्रम

Next

जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण उर्वरित गावांनाही न्याय मिळण्याच्या हेतूने शिवसेनेतर्फे शिवजल क्रांती उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याद्वारे मराठवाड्यातील अनेक गावांतील पाणीटंचाई दूर हेईल, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची देसाई यांनी पाहणी केली. पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत, असे देसाई म्हणाले.
औरंगाबादेत जलआयुक्तालय स्थापन व्हावे, अशी शिवसेनेची मागणी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक आहेत.
मी लवकरच वाल्मीतील (वॉटर अ‍ॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट) तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मराठवाड्यात जलआयुक्तालय स्थापन होण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sena's Shiv javakranti venture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.