न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवून कारण शोधणार

By admin | Published: February 16, 2016 03:49 AM2016-02-16T03:49:59+5:302016-02-16T03:49:59+5:30

गिरगावात रविवारी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात लागलेल्या आगीचे कारण मुंबई पोलीस न्यायवैद्यक प्रयोगशाळेला (एफएसएल) नमुने पाठवून स्वतंत्रपणे शोधणार आहेत.

Send the samples in the Forensic Laboratory to search for the reason | न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवून कारण शोधणार

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवून कारण शोधणार

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
गिरगावात रविवारी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात लागलेल्या आगीचे कारण मुंबई पोलीस न्यायवैद्यक प्रयोगशाळेला (एफएसएल) नमुने पाठवून स्वतंत्रपणे शोधणार आहेत. मुंबई पोलीस या आगीची महानगरपालिकेसोबतही चौकशी करीत आहेत. अजूनपर्यंत तरी मुंबई पोलिसांनी आगीबद्दल तक्रार नोंदविलेली नाही. आम्ही कार्यक्रमाचे संघटक आणि प्रत्यक्ष या घटनेच्या साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत आणि आग मुद्दाम कोणी लावली का याचीही चौकशी करणार आहोत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या उप कंत्राटदारांचीही त्यांनी कार्यक्रमात दुय्यम दर्जाचे साहित्य/उपकरणे वापरली का अशीही चौकशी केली जाणार आहे.
सध्या आम्ही या घटनेसंदर्भात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी तयार केली आहे. मुंबई महानगर पालिका आणि अग्निशमन दल हे आगीचे कारण शोधण्यात तज्ज्ञ असून ते आपला अहवाल सादर करतील. तरीही आम्ही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी नमुने पाठविणार आहोत.
कार्यक्रमाचे आयोजक विझक्राफ्ट आणि त्यांचे उपकंत्राटदार यांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत. आम्ही ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांचेही म्हणणे नोंदवून घेणार आहोत, तसेच आमच्या निष्कर्षांनुसार काय कायदेशीर कारवाई करायची याचा निर्णय घेणार आहोत, असे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ते श्रोत्यांतून ज्यांनी आगीचे व्हिडीओ चित्रीकरण केले ते आग प्राथमिक पातळीवर कशी उघडकीस आली हे तपासण्यासाठी गोळा करीत आहेत. हा आगीचा प्रकार कोणाकडून घातपातासाठी करण्यात आला आहे का हेदेखील आम्ही तपासणार आहोत, असेही हा अधिकारी म्हणाला. उप कंत्राटदाराने वापरलेली उपकरणे दुय्यम दर्जाची होती का व त्यामुळे आग लागली हेही आम्ही तपासून बघणार आहोत, असेही अधिकारी म्हणालाबॅरिकेड्सचा अडथळा
गिरगाव चौपाटीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारलेले बॅरिकेड्स, मेटल डिटेक्टर, पत्र्यांच्या पार्टिशन्समुळे महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास शर्थीचे प्रयत्न करावे लागले़ अखेर पोलिसांच्या मदतीने बॅरिकेड्स हटविल्यानंतर मदतकार्याला वेग मिळाला, असा अहवाल अग्निशमन दलाने दिला आहे़ या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ वाहतूक कोंडी फोडत घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच अवधी वाया गेल्याचे, अग्निशमन दलाने निदर्शनास आणले आहे़घाईत केली तयारी
आयोजक नितीन देसाई यांनी संघटकांकडे व्यासपीठ त्याची रचना करून रविवारी दुपारी साडेचार वाजता सोपविल्यामुळे कार्यक्रमाची अंतिम तयारी घाईघाईत करण्यात आली. नंतरच इतर व्यवस्था कराव्या लागल्या.तंत्र महागात पडले
आग आणि धुराच्या परिणामांसाठी (इफेक्ट्स) वापरण्यात आलेले पायरो तंत्र या शोसाठी खूपच महागात पडले. वाऱ्याची दिशा समुद्राच्या दिशेने होती. ती तशी नसती तर त्यामुळे फार मोठा अपघात घडला असता, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गिरगाव चौपाटीवर रविवारी रात्री ‘महाराष्ट्र रजनी’च्या व्यासपीठाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर, वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या सप्ताहातील अग्निप्रतिबंधक सुरक्षा आणखी चोख करण्यात आली आहे. विशेषत: एमएमआरडीएच्या मैदानावर आग विझवण्यासाठी ५०० साधने आणि ५० फायर मार्शल तैनात करण्यात आले आहेत. शिवाय आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

Web Title: Send the samples in the Forensic Laboratory to search for the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.