‘बातमी छापण्यासाठी पाकिटे पाठवितो!’
By admin | Published: February 2, 2016 03:42 AM2016-02-02T03:42:31+5:302016-02-02T03:42:31+5:30
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना बातम्या व छायाचित्रे वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असतात. काही वेळेस प्रसिद्धी मिळते तर बऱ्याच वेळा दखल घेतली जात नसल्याने पाकिटे पाठवितो
जळगाव : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना बातम्या व छायाचित्रे वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असतात. काही वेळेस प्रसिद्धी मिळते तर बऱ्याच वेळा दखल घेतली जात नसल्याने पाकिटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी एका प्रकाशन सोहळ्यात केले.
समाजातील यशस्वी बांधवांच्या कार्याचा गौरव व्हायलाच हवा. आमच्याही कार्याचा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गौरव होत असतो, छायाचित्रे छापून येत असतात; मात्र काही वेळा छापले जात नाहीत, त्यासाठी पाकिटे पाठवित असल्याचे खडसे म्हणाले. त्यावर उपस्थित हसताच ‘पाकिटे बातमीचे...’ असा खुलासा त्यांनी केला. लेवा पाटील समाजाचा सन्मान होताना दिसत नाही. कारण समाज विखुरला गेला आहे. यशस्वी समाजबांधवांचा गौरव आपणच करायला हवा, त्यासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)