सेनेची फुकटेगिरी; दुकानदाराला चोप
By admin | Published: March 2, 2016 03:47 AM2016-03-02T03:47:37+5:302016-03-02T03:47:37+5:30
फुकटात वडापाव दिले नाहीत, म्हणून विलेपार्ले येथील फरसाण मार्टचे मॅनेजर चेतन पटेल यांना मारहाण करणाऱ्या सुनील महाडिक या शिवसैनिकाला जुहू पोलिसांनी अटक केली.
मुंबई : फुकटात वडापाव दिले नाहीत, म्हणून विलेपार्ले येथील फरसाण मार्टचे मॅनेजर चेतन पटेल यांना मारहाण करणाऱ्या सुनील महाडिक या शिवसैनिकाला जुहू पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्हीमुळे वाचा फुटलेल्या या फुकटेगिरीच्या प्रकारानंतर शिवसेनेतून महाडिकची हकालपट्टी झाली आहे. स्वाभिमानी संघटनेनेही या संधीचा फायदा घेत शिवसेनेविरोधात दादरला फुकटात वडापाव वाटत आंदोलन केले.
विलेपार्ले पश्चिमेकडील एका मैदानात महाडिकने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. त्यासाठी फरसाण मार्टच्या मॅनेजरकडून १०० वडापाव मोफत देण्याची मागणी महाडिकने केली होती. मात्र मोफत वडापाव देण्यास नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या महाडिकने शनिवारी दुकानाच्या मॅनेजरला बांबूने मारहाण केली होती. त्यात जबर जखमी झालेल्या मॅनेजरला उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी दुकानातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने महाडिकविरोधात गुन्हा दाखल केला. रविवारी अटक करून त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र सध्या आरोपी जामिनावर सुटल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी दिली.जागेच्या वादातून मनसेने
फोडले बिल्डरचे कार्यालय
मीरा रोड : येथील एका इमारतीलगतच्या जागेतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेला फलक व झेंडा
काढून कचऱ्यात टाकल्याचा आरोप करत मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी विकासकाच्या कार्यालयाची तोडफोड
केली. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी
गुन्हा दाखल केला आहे.