जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 09:53 AM2020-09-22T09:53:40+5:302020-09-22T10:13:31+5:30

डॉ. भाऊ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्र पाली प्राकृत विभागाचे माजी रिडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते.

Senior Ambedkarite Literary Dr. Bhau Lokhande passed away | जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. भाऊ लोखंडे यांनी रशियातील बौद्धधर्म हे पुस्तक लिहिले आहे.

नागपूर - जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध दलित साहित्याच्या चळवळीत महत्वाचे योगदान असलेले डॉ. भाऊ लोखंडे हे आंबेडकरवादी विचारवंत होते. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता.  

डॉ. भाऊ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्र पाली प्राकृत विभागाचे माजी रिडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. याशिवाय, त्यांनी अनेक संस्थ्यांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव या विषयावर डॉ. भाऊ लोखंडे यांनी पीएचडी साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच, रशियातील बौद्धधर्म हे पुस्तक लिहिले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन कार्याला त्यांनी नेहमीच प्रोत्साहित केले. ते आंबेडकरी चळवळीतील अनेक संस्था, संघटनांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या पार्थिवावर वैशाली निर्वाण घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

भाऊ लोखंडेंनी लिहिलेली पुस्तके :
- अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
- डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा (पारिजात प्रकाशन, कोल्हापूर - २०१२)
- मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव
- महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित 
- रशियातील बौद्धधर्म
- सौन्दरनन्द महाकाव्यम् 
- डॉ. आंबेडकरी बावीस प्रतिज्ञा
- बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना उपदेश, मार्गदर्शन व शिक्षण विषयक विचार

आणखी बातम्या...

- "येत्या पाच वर्षांत ९४८८ वैमानिकांची आवश्यकता भासणार"    

- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन    

- गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास    

- आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२० - मीनसाठी काळजीचा अन् मिथुनसाठी आनंदाचा दिवस    

- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन 

- Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

 

Web Title: Senior Ambedkarite Literary Dr. Bhau Lokhande passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर