भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
By संजय पाठक | Published: November 14, 2024 09:26 AM2024-11-14T09:26:14+5:302024-11-14T09:27:20+5:30
Former MP Harishchandra Chavan passed away: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोड वरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
नाशिक- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोड वरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
पेठ - सुरगाणा या आदिवासी मतदारसंघाच्या राजकारणात सुरुवातीला अपक्ष म्हणून उतरलेले हरिश्चंद्र चव्हाण पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून ते एकदा खासदार तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत ते सुरगाणाचे सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील विविध पदे त्यांनी भूषवली होती.
त्यांचे पार्थिव नाशिक येथील कॉलेजरोडवरील त्यांच्या निवासस्थानी दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांना ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. चव्हाण यांच्या परिसरात पश्चात नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सभापती कलावती चव्हाण, मुलगा समीर, मुलगी स्नेहल असा परिवार आहे.