भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन
By Admin | Published: November 7, 2016 07:23 AM2016-11-07T07:23:03+5:302016-11-07T07:51:37+5:30
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि .7 - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७७ वर्षांच्या होत्या. 1962 पासून राजकरणात सक्रीय असणा-या जयवंतीबेन मेहता यांनी नगरसेविकेपेसून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी ऊर्जामंत्रीपद भुषवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयवंतीबेन मेहतांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
जयवंतीबेन मेहता गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयवंतीबेन मेहता या 1996 ते 1999 च्याकाळात वाजपेयी सरकारमध्ये उर्जाराज्यमंत्री होत्या. यासह भाजपची अनेक महत्वाची पदं जयवंतीबेन मेहता यांनी भूषवली होती.