शरद पवारांनी नव्वदच्या दशकापासून सातत्याने आपल्या भूमिका बदलल्या; सुधीर मुनगंटीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:14 PM2022-05-02T18:14:06+5:302022-05-02T18:28:17+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधार मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Senior BJP leader Sudhar Mungantiwar has criticized NCP chief Sharad Pawar | शरद पवारांनी नव्वदच्या दशकापासून सातत्याने आपल्या भूमिका बदलल्या; सुधीर मुनगंटीवारांची टीका

शरद पवारांनी नव्वदच्या दशकापासून सातत्याने आपल्या भूमिका बदलल्या; सुधीर मुनगंटीवारांची टीका

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदुत्वाबद्दल अॅलर्जी आहे काय हे माहीत नाही. नव्वदच्या दशकापासून शरद पवार सातत्याने सोयीनुसार भूमिका बदलतात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविषयीची त्यांची भूमिका आठवून बघा, असे सांगत पवार यांच्या भूमिका भरती-ओहोटी प्रमाणे बदलत असतात, अशी टीका त्यांनी केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपशी धूर्तपणाने वागणार असे विधान केले. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःचा स्वभाव सांगितला असल्याचे मत व्यक्त केले. यावर अधिक भाष्य नको असेही ते म्हणाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सज्जन व्यक्ती आहेत. पण आता त्यांचा मेंदू राजकीय झाला आहे. उस्मानीवर काय कारवाई झाली, हे अजून कळलेले नाही. मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या. कोण याचा सूत्रधार होता, कोण दारूच्या बाटल्या देऊन फाईलींवर सह्या घ्यायचा, हेही कळले नाही. त्यांना भीमाशंकर सद्बुद्धी देवो, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

बाबरी मशीद पडल्यानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यात शिवसैनिक किती होते, याची माहिती संजय राऊत यांनी जाहीर करावी, असे प्रति आव्हान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. एफआयआर दाखल झालेल्या यादीत एकतरी शिवसैनिक दाखवून द्यावा. तेव्हा आम्ही मानू की राऊत सत्य बोलत आहेत. मी असो, भंडारी असोत किंवा खुद्द राऊत असोत, कोण काय बोलतो, हे महत्वाचे नाही. एफआयआरमध्ये शिवसैनिकांची नावे राऊत यांनी दाखवावी किंवा एफआयआर जेव्हा दाखल होत होता, तेव्हा धुर्तपणे  काँग्रेसची माफी मागून आपली नावे एफआयआरमधून काढली का, ते स्पष्ट करावे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

Web Title: Senior BJP leader Sudhar Mungantiwar has criticized NCP chief Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.