दुबई सहलीसाठी तरुणीकडे वरिष्ठाची शरीरसुखाची मागणी

By admin | Published: August 7, 2016 09:40 PM2016-08-07T21:40:57+5:302016-08-07T21:40:57+5:30

तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करणा-या खासगी बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Senior body demand for a Dubai visit | दुबई सहलीसाठी तरुणीकडे वरिष्ठाची शरीरसुखाची मागणी

दुबई सहलीसाठी तरुणीकडे वरिष्ठाची शरीरसुखाची मागणी

Next

पुणे : क्रेडिट कार्डसंबंधी चांगले काम केल्यामुळे संस्थेमार्फत दिल्या जाणा-या दुबई सहलीसाठी सहकारी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करणा-या खासगी बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिला अधिका-याचाही समावेश आहे.
याप्रकरणी 24 वर्षीय पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. शंतनू कुलकर्णी आणि दिव्या तिवारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी एका खासगी बँकेच्या ह्यक्रेडीट कार्डह्ण विभागात सिनीअर बिझनेस एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. त्यांच्या बँकेमार्फत क्रेडीट कार्ड विभागात चांगले काम करणा-या कर्मचा-यांना दुबईमध्ये सहलीसाठी पाठवले जाते. पिडीत तरुणीसह तिच्या अन्य तीन सहकारी तरुणींची दुबई सहलीसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, पिडीत तरुणीकडून एका ग्राहकाच्या अर्जावर वेगळ्या व्यक्तीचे छायाचित्र चिकटवले गेले होते.
मुख्या शाखेने याबाबत शंतनू कुलकर्णी आणि क्रेडीट कार्ड विभागाची प्रमुख असलेल्या तिवारी हिला कळवले होते. त्याचा संदर्भ देत मे महिन्यामध्ये तिवारीने पिडीत मुलीला गाठून दुबई सहलीसाठी तिची झालेली निवड रद्द होण्याची शक्यता असल्याची भिती घातली. सहलीला जायचे असल्यास कुलकर्णीला खुश करावे लागेल, त्याच्यासोबत एक रात्र काढावी लागेल असे सांगितले. या प्रकाराला नकार दिलेल्या पिडीत तरुणीवर तिवारी सतत दबाव टाकत होती. सहल जसजशी जवळ येत होती तसतसे ती पिडीत मुलीला जर आमचे ऐकले नाही तर आयुष्य बरबाद करण्याची धमकी देत होती. मात्र, पिडीत मुलगी तिच्या निर्णयावर ठाम होती.
एक आॅगस्ट रोजी कुलकर्णी बँकेत आल्यानंतर त्याने पिडीत तरुणीला कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावून सोबत रात्र काढली नाही तर दुबई सहलीला नेणार नाही असे सांगितले. तसेच, बँकेतून काढून टाकण्याची आणि फ्रॉड प्रोफाईल तयार करण्याची धमकी दिली. तिचा मोबाईलवर अश्लिल शेरेबाजीही करीत लिफ्टमध्ये तिचा हात धरला. घाबरलेली तरुणी कामावरच जाईनाशी झाली. कुटुंबियांनी याचे कारण विचारल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. खडक पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे.

Web Title: Senior body demand for a Dubai visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.