ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर
By admin | Published: January 19, 2015 09:43 AM2015-01-19T09:43:05+5:302015-01-19T09:46:11+5:30
'कॉमन मॅन'चे जनक असणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - 'कॉमन मॅन'चे जनक असणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ९४ वर्षांचे लक्ष्मण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी रात्री पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
लक्ष्मण यांची प्रकृती बरीच खालावली आहे. युरिन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे अनेक अवयव काम करेनासे झाल्यामुळे आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, अशी माहिती लक्ष्मण यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिली आहे.
आर के लक्ष्मण यांना २०१० साली पक्षाघात झाला होता. त्यामुळे त्यांना नीट बोलता येत नव्हते. मात्र तरीही त्यांनी कार्टून आणि स्केचिंग सुरूच ठेवले होते. लक्ष्मण यांचे ‘कॉमन मॅन’ हे कार्टून अनेक दशके चर्चेत राहिले आहे.