ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे निधन
By admin | Published: May 10, 2015 09:38 AM2015-05-10T09:38:37+5:302015-05-10T09:43:23+5:30
ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १० - ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. ६५ वर्षांचे बेडेकर यांनी रत्ना मेमोरियल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
शिवचरित्र तसचे मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आजवर शिवचरित्रावर पाच हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांना मोडी व पर्शियन भाषाही अवगत होती. इतिहास संशोधनासाठी त्यांनी जगभर भ्रमंती केली होती.