ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन

By admin | Published: August 31, 2016 05:33 AM2016-08-31T05:33:37+5:302016-08-31T05:33:37+5:30

ष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते

Senior Literary Vs. C. Kanitkar's death | ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. कानिटकर यांचे निधन

Next

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कानिटकर हे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यामुळे उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत माजवली. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
इस्रायल-युद्ध, युद्ध आणि युद्धच, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘विन्स्टन चर्चिल’, ‘महाभारताचा इतिहास’, ‘होरपळ’ ही कानिटकर यांची पुस्तके साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहेत. कानिटकर यांचा जन्म मालाड, मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी झाला. बी. एसस्सी. आणि बी. ए. (आॅनर्स) अशा दोन पदव्या त्यांनी संपादन केल्या. केंद्र सरकारच्या अकाउंटंट जनरलच्या कचेरीत ३७ वर्षे त्यांनी नोकरी केल्यानंतर लेखनामध्ये ते अधिक काळ रमले. इतिहास व चरित्रे याविषयावर त्यांनी विपुल लेखन केले.
‘माओ क्रांतीचे’, व्हिएतनाम’, ‘अ‍ॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी’, ‘हिटलरचे महायुद्ध’, ‘अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरूष’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख’ या पुस्तकाला साहित्यसम्राट न. चिं. केळकर पारितोषिकही मिळाले आहे. ‘दर्शन ज्ञानेश्वरी : गाजलेल्या प्रस्तावना’ या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. फ्रँक वॉरेल आणि रोहन कन्हाय अशी मुलांसाठी त्यांनी चरित्रेही लिहिली. ‘खोला धावे पाणी’, शहरचे दिवे’ यांसारख्या कादंबऱ्या तसेच ‘मनातले चांदणे’, ‘आसमंत’, ‘सुखाची लिपी’, ‘लाटा’, ‘आणखी पूर्वज’, ‘जोगवा’ हे त्यांचे काही गाजलेले कथासंग्रह आहेत. ‘पूर्वज’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांनी मौलिक लेखन कार्य केले. ‘संस्कार’, ‘वय नव्हतं सोळा’, ‘एक रात्रीची पाहुणी’, ‘अकथित कहाणी’ आणि ‘अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न’ ही त्यांची गाजलेली अनुवादित पुस्तके आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Senior Literary Vs. C. Kanitkar's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.