ज्येष्ठ साहित्यकार शंकर वैद्य स्मृतिदिन
By admin | Published: September 23, 2016 09:45 AM2016-09-23T09:45:42+5:302016-09-23T09:52:41+5:30
ज्येष्ठ साहित्यकार, समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक शंकर वैद्य यांचा आज (२३ सप्टेंबर) स्मृतिदिन
Next
>
प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २३ - ज्येष्ठ साहित्यकार, समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक शंकर वैद्य यांचा आज (२३ सप्टेंबर) स्मृतिदिन. १५ जून १९२८ साली त्यांचा जन्म झाला. ओतूर या जन्मगावातून निघून, जुन्नरसारख्या गावी माध्यमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य पुण्याला नोकरीसाठी स्थायिक झाले. आधी नागपूरच्या, नंतर पुण्याच्या आणि शेवटची वर्षे मुंबईच्या महाविद्यालयांत ते मराठीचे अध्यापन करत राहिले.
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.
कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता असलेल्या ’प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे, आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या ’आदित्य’ या काव्यसंग्रहांचे संपादन शंकर वैद्य यांनी केले होते.
शंकर वैद्यांच्या पत्नी सरोजिनी वैद्य याही एक प्रतिभाशाली कवयित्री आणि चरित्र लेखिका होत्या.
आज हृदय मम विशाल झाले
त्यास पाहुनी गगन लाजले
आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमधे धरली अवनी
अरुणाचे मी गंध लाविले
या विश्वाच्या कणाकणांतुन
भरुन राहिले अवघे 'मी' पण
फुलताफुलता बीज हरपले
अशा एक ना अनेक सुंदर कवितांची पर्वणी देणा-या शंकर वैद्य यांना बालपणी निसर्ग सोबतीला होता. त्यामुळे त्यांच्या कवितांमधूनही निसर्गाचे दर्शन मोठ्या प्रमाणावर होत गेले. 'कालस्वर' हा शंकर वैद्य यांचा पहिला काव्य संग्रह होता. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 'दर्शन' हे त्या काव्यसंग्रहाचे नाव. मधल्या 27 वर्षांच्या कालखंडात वैद्य यांनी मासिके, विशेषांक यातून कवितांचे लिखाण सुरू ठेवले होते. काव्यसमारंभांचे सूत्रसंचालनही ते अत्यंत आवडीने करत.
आकाशवाणीवर त्यांच्या काव्य वाचणाच्या कार्यक्रमांनाही श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असायचा. 'आला क्षण, गेला क्षण' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. वैद्य यांच्या अनेक कवितांना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आवाजही दिला आहे.
२३ सप्टेंबर २०१४ साली त्यांचे निधन झाले.
सौजन्य : मराठी विकिपीडिया