वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बढत्या

By admin | Published: August 3, 2014 01:53 AM2014-08-03T01:53:32+5:302014-08-03T01:53:32+5:30

दोन्ही कॉँग्रेसमधील कुरघोडीमुळे दीड महिन्यापासून रखडलेल्या वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बढत्या, बदल्यांना अखेर शनिवारी ‘मुहूर्त’ मिळाला.

Senior police officers: The rise of | वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बढत्या

वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बढत्या

Next
मुंबई :  दोन्ही कॉँग्रेसमधील कुरघोडीमुळे दीड महिन्यापासून रखडलेल्या वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बढत्या, बदल्यांना अखेर शनिवारी ‘मुहूर्त’ मिळाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर विविध दर्जाच्या 9क् अधिका:यांचे त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. 
अप्पर महासंचालकपदी दोघांची तर विशेष महानिरीक्षक/ सहआयुक्त आणि अप्पर आयुक्त/उपमहानिरीक्षक म्हणून अनुक्रमे 3 व 4 अधिका:यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर  आपल्याला सोयीस्कर ठरेल, अशा मर्जीतील अधिका:यांची नियुक्ती व्हावी, यासाठी ‘राष्ट्रवादी’कडून शर्थीचे प्रय} सुरु होते. मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांच्या आग्रहाला न जुमानता प्रस्तावित यादीमध्ये शेवटच्या क्षणी काही महत्त्वपूर्ण बदल केले. तर काहींना आहे त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आले असल्याचे गृह विभागातील सूत्रंकडून सांगण्यात आले. फोर्स वनचे विशेष महानिरीक्षक रजनीश सेठ यांची पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तर तरतूद विभागातील डी. के. व्यंकटेशम यांची प्रशिक्षण व खास पथकामध्ये अप्पर महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.  
 
अप्पर महासंचालक एस.पी.गुप्ता (प्रशिक्षण व खास पथक - मुख्य दक्षता अधिकारी महावितरण), प्रभात रंजन  (एसीबी- प्रशासन, मुख्यालय), संजय बर्वे (प्रशासन- रेल्वे), विशेष महानिरीक्षक अमिताभ गुप्ता (प्रशिक्षण-कोकण परिमंडळ), संजय सक्सेना (नागपूर शहर- फोर्सवन), प्रभात रंजन (रेल्वे- तरतूद),  डॉ. सुखविंदर सिंग (कोकण- राज्य गुप्त वार्ता विभाग), प्रशांत बुरडे (एसआरपी नागपूर- सागरी सुरक्षा, मुंबई), अनुपकुमार सिंह (नक्षलविरोधी पथक, नागपूर- नागपूर शहर), डी.एम.फडतरे (ठाणो शहर- 
अन्न व औषधे प्रशासन) व 
एस. टी. बोडखे (विधानमंडळ- ठाणो शहर मुख्यालय)
 
ेसंदीप कर्णिक आयुक्तालयात
मुंबई : मुंबई परिमंडळ दोनचे उपायुक्त निसार तांबोळी यांची नाशिक आयुक्तालयात मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. मावळमध्ये शेतक:यांवर झालेल्या गोळीबारप्रकरणी न्यायालयीन चौकशीमध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या संदीप कर्णिक यांची ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून मुंबई आयुक्तालयात संवर्ग पदावर बदली करण्यात आली आहे.
ठाणो जिलचे विभाजन करुन नव्याने बनविण्यात आलेल्या पालघर जिलचे पहिले पोलीस अधीक्षक बनण्याचा मान गडचिरोलीतील पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना मिळाला आहे. रायगड पोलीस अधीक्षकपदी एस. एच. महावरकर यांची बदली करण्यात आली आहे. साडेतीन वर्षापासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर  यांना अखेर जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. 
राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवेतील 4क् उपायुक्त/अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले. त्याशिवाय 3क् अप्पर अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. 
अन्य अधिका:यांची नावे अशी : (कंसात कोठून -कोठे)
प्रभाकर बुधवंत (औरंगाबाद  सीआयडी- ठाणो शहर), विरेंद्र मिश्र (अकोला-मुंबई), एस. डी. बाविस्कर (एसीबी औरंगाबाद- सिंधुदुर्ग), दत्ता कराळे (मुंबई- एसीबी ठाणो), सुधीर दाभाडे (हिंगोली- ठाणो शहर), पी.व्ही.उगले (नवी मुंबई-मुंबई), विजय पाटील (नवी मुंबई-नाशिक शहर), अंकुश शिंदे (रायगड- सीआयडी पुणो), महेश घुर्ये (परिमंडळ 6-एसआयडी, मुंबई), आर. बी. डहाळे (एसआयडी- मरोळ प्रशिक्षण केंद्र), ए. आर. मोराळे (नवी मुंबई-एसआरपी दौंड), एस. व्ही. पाठक (नवी मुंबई-पुणो शहर), सुप्रिया पाटील ( मुंबई), एस. जयकुमार (जळगाव-मुंबई), सचिन पाटील (उस्मानाबाद- ठाणो), अनिल कुंभारे (ठाणो शहर-औरंगाबाद ग्रामीण), दत्तात्रय मंडलिक (मुंबई- सोलापूर ग्रामीण), सत्यनारायण चौधरी (गुन्हे शाखा मुंबई- परिमंडळ-9),  अरविंद साळवे (एसीबी अमरावती - नवी मुंबई), व्ही. डी. पांढरे ( पुणो शहर -नवी मुंबई), अशोक दुधे (ठाणो -मुंबई), पी. एस. घाटकर (मरोळ- मुंबई), एस. एम. परोपकारी (ठाणो शहर-सोलापूर), एस. डब्ल्यू. जांभूळकर (एसआयडी मुंबई-मुंबई), एस. डी. कोकाटे (लातूर-वसई), प्रशांत मोहिते (महामार्ग ठाणो- नाशिक), एस.पी.निशाणदार (वसई-मुंबई), रश्मी कंरदीकर (महामार्ग मुंबई-ठाणो शहर), डॉ. व्ही.एम.राठोड (फोर्सवन- मुंबई), पौर्णिमा गायकवाड (एसआयडी नागपूर-सीआयडी नवी मुंबई), बी.बी.पाटील (ठाणो -महामार्ग मुख्यालय मुंबई). (प्रतिनिधी)
 
मुंबईतील उत्तर  विभागाचे अप्पर आयुक्त ब्रिजेश सिंग यांची सीआयडीमध्ये पदोन्नतीवर तर आर.के.सिंघल व मधुकर पांडे यांना बढतीवर अनुक्रमे रेल्वेचे आयुक्त आणि प्रशिक्षण व खास पथकामध्ये बदली करण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त पदावर असलेल्या  छेरिंग दोरजे (पूर्व विभाग मुंबई), के.एम.एम.प्रसन्ना (गुन्हे अन्वेषण शाखा), आर.डी. शिंदे (मध्य विभाग, मुंबई), व केशव जाधव (उत्तर विभाग) यांची अप्पर  आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे.
 
दोन वर्षे पूर्ण करणारे दयाळ सहावे डीजीपी 
जमीर काझी ल्ल मुंबई
दोन लाखावर पोलीस दलाचे नेतृत्व करणारे संजीव दयाळ हे सलग दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करणारे राज्यातील सहावे तर गेल्या 8 वर्षातील पहिले पोलीस महासंचालक ठरले आहेत. शुक्रवारी त्यांनी हा कार्यकाळ पूर्ण केला असून सेवानिवृत्तीसाठी अद्याप 14 महिन्याचा अवधी असल्याने तोपर्यत ते प्रमुख राहिल्यास सर्वाधिक काळ हे पद भूषविणारे अधिकारी ठरतील. विशेष म्हणजे 3क् वर्षापूर्वी पहिले डीजीपी के. सी. मेर्ढेकर 38 महिने या पदावर होते. दयाळ यांनाही तितकाच कालावधी मिळणार आहे.
   पोलिसांच्या बदल्यांबाबतच्या नव्या नियमाप्रमाणो अधिका:यांसाठी दोन वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला असला तरी पोलीस महासंचालकांहून दुसरे वरिष्ट पद नाही. त्याचप्रमाणो प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाण्यास दयाळ यांनी नकार दिल्याने  सद्यस्थितीमध्ये तेच सप्टेंबर 2क्15 पर्यत या पदावर राहतील, असे गृहविभागातील वरिष्ठ अधिका:यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे त्यांना हलविण्यासाठी प्रय}शील असलेले काही राजकारणी व त्यांच्या कारवाईचा दंडुका बसलेल्या काही अधिका:यांची मोठी गोची झाली आहे.   पोलीस दलातील पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद असून केंद्रीय स्पर्धा परीक्षेद्वारे थेट उपायुक्त म्हणून सेवेत दाखल झालेला प्रत्येक आयपीएस अधिकारी हा निवृत्त होण्यापूर्वी काही महिन्यांसाठी का होईना, प्रमुखपद मिळण्याची आशा बाळगत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजतागायत एकूण 38 अधिका:यांना ही संधी मिळाली आहे. त्यापैकी सुरवातीचे 14 जण हे विशेष महानिरीक्षक दर्जाचे होते. 25 फेब्रुवारी 1982पासून राज्य पोलीस प्रमुख पद हे पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आला. त्याचा पहिला मान के. पी. मेर्ढेकर यांना मिळाला. ते 38 महिने या पदावर होते. 
त्यांच्यानंतर डॉ. पी. एस. पसरिचा यांना सर्वाधिक 33 महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. या दोघांशिवाय सूर्यकांत जोग, वसंत सराफ, अरविंद इनामदार, सुभाष मल्होत्र यांनी दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी या पदावर  काम पाहिले आहे. तर सर्वात अत्यल्प  म्हणजे 3 महिने ओमप्रकाश बाली या पदावर काम पाहिले आहे. 
दयाळ हे1977 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून 31 जुलै 2क्12 रोजी  त्यांनी के. सुब्रम्हण्यम यांच्याकडून पदभार घेतला आहे. पुढच्या वर्षी 3क् सप्टेंबरला ते निवृत्त होणार असून त्यांच्यानंतर सेवाजेष्टतेनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख प्रवीण दीक्षित हे डीजीपी पदाचे दावेदार आहेत. दीक्षित यांनी एसीबीचा कार्यभार स्वीकारल्याने लाचखोरांवरील कारवाईचे प्रमाण 1क्क् टक्क्याने वाढले आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचा:यांमध्ये काहीशी दहशत निर्माण झाली आहे.
 
राजकारण्यांपासून दूर : करडी शिस्त व कोणाची भीडभाड न बाळगणारे अधिकारी  म्हणून  संजीव दयाळ यांची खात्यात ओळख आहे. मितभाषी दयाळ हे मुंबईचे आयुक्त असताना तत्कालीन अप्पर मुख्य सचिव (गृह) चंद्रा अय्यंगार यांच्याशी काही मुद्यांवर मतभेद झाले होते. त्यावरून ते राजीनामा देण्याच्या पवित्र्यात होते. नियमबाह्य काम करण्यास त्यांचा विरोध असल्याने राजकारण्यांशी त्यांचे फारसे जमत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात पाठविण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मात्र त्यांनी त्याबाबत उत्सुक नसल्याचे केंद्रीय गृहविभागाला स्पष्ट कळविल्याने हे प्रय} फसले. अद्यापही काही राजकारणी व अधिका:यांना ते नकोसे असले तरी त्यांना हलविण्यामागे कोणतेच विशेष कारण व  तांत्रिक मुद्दा नसल्याचे वरिष्ट अधिका:यांकडून सांगण्यात आले.

 

Web Title: Senior police officers: The rise of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.