ज्येष्ठ समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव कालवश

By Admin | Published: May 27, 2016 09:31 AM2016-05-27T09:31:42+5:302016-05-27T09:43:56+5:30

मराठीतील प्रख्यात समीक्षक, लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव यांचे शुक्रवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.

Senior reviewer and former convener of the East Pvt. Ra.g. Jadhav Kalwash | ज्येष्ठ समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव कालवश

ज्येष्ठ समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव कालवश

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - मराठीतील प्रख्यात समीक्षक, लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सकाळी सहा वाजत पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी १२.३०च्या सुमारास जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
मराठीतील प्रख्यात समीक्षक असलेल्या प्रा. जाधव यांनी जाधव यांनी समीक्षा, कविता तसेच ललित लेखनही केले. स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे नोकरी केल्यानंतर ते १० वर्ष प्राध्यापकी पेशात कार्यरत होते. ३७ काव्यसंग्रहांचे परिक्षण लिहीणारे जाधव तसेच १८५० ते २००० काळातील मराठी नवकवितांवरील प्रयोग ह्यावर परिसंवादातही सहभागी होते. याशिवाय मराठी विश्वकोषातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी २० वर्षे जबाबदारी सांभाळली.
तसेच औरंगाबाद येथील २००४ साली झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही जाधव यांनी भूषवले असून ते मराठी साहित्य परिषदेचेही अध्यक्ष होते. 
राज्य शासनातर्फे देण्यात येणारा २०१५ वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप असते.
 
रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य
आनंदाचा डोह
काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये
निवडक समीक्षा
निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी
पंचवटी
प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
माझे चिंतन
वागर्थ
वाङ्‌मयीन निबंध लेखन
वाङ्‌मयीन परिप्रेक्ष्य
वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
विचारशिल्प
संध्यासमयीच्या गुजगोष्टी(निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन)(प्रकाशन वर्ष २०१३)
समीक्षेतील अवतरणे
साठोत्तरी मराठी कविता व कवी
साहित्य व सामाजिक संदर्भ
साहित्याचे परिस्थितीविज्ञान

Web Title: Senior reviewer and former convener of the East Pvt. Ra.g. Jadhav Kalwash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.