ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर व ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 11:51 AM2017-11-05T11:51:06+5:302017-11-05T12:34:15+5:30

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेबकिर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा

Senior Settler Baba Parsekar and senior actress Nirmala Gogte were honored with theater life award. | ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर व ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर व ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Next

मुंबई:  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेबकिर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनीआज केली. 

रूपये ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. आज ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्याअध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधानसचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष  मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर तसेच  फैय्याज, जनार्दन लवंगारे,  रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे,  राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत.

बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकारआहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्यातिन्ही धारांमध्ये बाबांनी लखलखीत कामगिरी केली आहे.जे.जे.कला महाविद्यालयातून ॲप्लाईड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबापार्सेकरांना पहिलेच गुरु भेटले ते प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे.त्यांच्याबरोबर राहून बाबा भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांना नेपथ्य करु लागले. विजया मेहता या दुसऱ्या गुरु तिथे त्यांनालाभल्या. ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिकरंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या सागरमाझा प्राण या नाटकाचे वैशिष्टयपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आजवर ४८५ नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले आहे.

निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णरावचोणकर, प्रो.बी.आर. देवधर यांचेकडून आवाज साधना शास्त्राचेविशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. सुरुवातीच्या काळात महिलाकलासंगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिकात्यांनी केल्या. साहित्य संघ मंदिर, मुंबई या संस्थेमार्फत व्यावसायिकरंगभूमीवर मा. दामले, सुरेशहळदणकर, प्रसाद सावकार,नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजीभाटवडेकर यांसारख्या नामवंत कलाकारांसमवेत काम करण्याचीसंधी त्यांना मिळाली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेकसंस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशातआकाशवाणी व दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार येत्या २० नोव्हेंबर२०१७ रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर /येथे समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वीश्री. प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्रपेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल,  सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक आणि लीलाधरकांबळी यांना प्रदान करण्यात आला आहे.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज,प्रसाद सावकार,जयमाला शिलेदार,  अरविंद पिळगावकर, रामदासकामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी आणि चंद्रकांतउर्फ चंदू डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

Web Title: Senior Settler Baba Parsekar and senior actress Nirmala Gogte were honored with theater life award.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.