अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 08:30 PM2024-09-15T20:30:36+5:302024-09-15T20:32:03+5:30

Anna Hazare Reaction On Delhi CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

senior social activist anna hazare first reaction over arvind kejriwal declare to resign as cm of delhi | अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Anna Hazare Reaction On Delhi CM Arvind Kejriwal: सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी जंगी स्वागत केले. यातच आगामी दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल केली. यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या घडामोडींवर भाष्य केले आहे. 

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक चर्चा करणार नाही. तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करतील, अशा काही प्रमुख अटींसह सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या घोषणेनंतर भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 

अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अरविंद केजरीवाल यांचे राजीनामा देण्याबाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेले शहाणपण असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांना आपण सुरुवातीपासून समाजसेवा करा. आपण खूप पुढे जाल असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता त्यांना याची जाणीव झाल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. ते एबीपीशी बोलत होते. 

दरम्यान, सीता वनवासातून परतली तेव्हा तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. मी आता अग्निपरीक्षा देत आहे. दिल्लीत  फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. माझी मागणी आहे की, ही निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घ्यावी. महाराष्ट्रासोबत दिल्लीची विधानसभा निवडणूक होऊ दे. जनतेचा निर्णय येईपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. आता जनतेने मला पुन्हा निवडून दिल्यानंतरच मी आणि मनिष सिसोदिया पदांची जबाबदारी स्वीकारु, असे सांगत पुढील दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी घोषित केले.

नितीन गडकरींना पूर्ण ताकदीने प्रचारात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपाला बराच फायदा होईल, असं वाटतं का?

हो (1930 votes)
नाही (1324 votes)
सांगता येत नाही (187 votes)

Total Votes: 3441

VOTEBack to voteView Results

Web Title: senior social activist anna hazare first reaction over arvind kejriwal declare to resign as cm of delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.