ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 07:37 AM2017-08-08T07:37:53+5:302017-08-08T07:38:19+5:30

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे मंगळवारी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते.

Senior Social Worker Dr. Bhimrao Gasti passed away | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचे निधन 

Next


 कोल्हापूर, दि. 8 -  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे मंगळवारी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता बेळगावातील यमनापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी 'उत्थान' ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. 
बेरड (आत्मकथन) आणि आक्रोश या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. सांजवारा हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. 


पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.

Web Title: Senior Social Worker Dr. Bhimrao Gasti passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.