ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सू.गवई यांचे निधन
By admin | Published: July 25, 2015 04:41 PM2015-07-25T16:41:09+5:302015-07-25T17:27:45+5:30
ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने आज नागपूरमध्ये निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ - ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी नागपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्रातील दलित चळवळीचे एक अग्रणी नेते असलेल्या गवई यांनी बिहार व केरळचे माजी राज्यपालपद भूषवले. त्यांचा जन्म १९२९ साली अमरावतीत झाला. गवई यांनी दलितांच्या प्रश्नासाठी सतत आवाज उठवला. दलित चळवळीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांचे महत्वाचे स्थान होते.
गवई यांचा जीवनपट :
रामकृष्ण सूर्यभान गवई - जन्म ३० ऑक्टोबर १९२९
जन्मस्थळ : दारापुर जिल्हा अमरावती
शैक्षणक पात्रता: नागपुर विद्यापीठ (महाराष्ट् )चे पदवीधर
भूषवलेली पदे
सभासद महाराष्ट्र विधान परिषद्
उपाध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद - १९६८-७८
अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद १९७८-८२
कॉमनवेल्थ पर्लमेंटरी असोसिएशन महाराष्ट् शाखेचे सयुक्त उपाध्यक्ष
१२ डिसेबर १९८६ ते डिसेंबर १९८८ विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद्
१९९८-९९ सदस बारावी लोकसभा
एप्रिल २००० राज्यसभेवर निवडून आले
मिळालेले सन्मान
कुष्ठरोगिकरिता बहुमूल्य मदत व सहाय्य याबद्दल मिळालेले कुष्ठमित्र अवार्ड आणि कुष्ठरोगियांचा मित्र अवार्ड
प्रियदर्शनी ग्रुप ,मुंबई यांचे माध्यमातून समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य तसेच अस्पृश्यता निर्मूलन आणि कुष्ठरोग या क्षेत्रात केलेल्या प्रशसनीय कार्यबद्दल पुरस्कार
डॉ बाबासाहेब अम्बेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ईश्वरी देवी अॅवार्ड
इतर माहिती
विद्यार्थी दशेपासून सामजिक व राजकिय चळवळीत सक्रीय सहभाग ,महाराष्ट्र विधान परिषदचे अखंड तिस वर्ष सभासदत्व (२६जुले १९९४) रोजी निवृत्त )महाराष्ट्र राज्यात एम्प्लॉयमेंट गारंटी स्कीम सुरु व्हावी यeकरिता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाइक आणि महाराष्ट्र विधान परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष श्री व्ही एस पागे याच्या सहकार्यातून पायाभूत काम केले
अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,उपाध्यक्ष जागतिक बौद्ध फेलोशिप(सेन्ट्रल जनरल कौंसिल ऑफ़ जागतिक बौद्ध फेलोशिप यांच्या बैंकॉक येथील सभेत एकमताने निवड) त्यांच्या संस्थेत 1998 मध्ये पुन्हा निवड
दादासाहेबानी आपल्या दलित बांधवांच्या उद्घारासाठी भरीव कामगिरी तर केलिच त्याचबरोबर जातिभेद ,धर्मभेद वा पंथभेद पाळुन स्वजातियाना सवलती देऊन इतराणा दूर ढकलन्याचा आपपभाव कधीच दाखवला नाही .
भूतपूर्व चेयमन ,धार्मिक आणि भाषिक उपसमिति अल्पसंख्यांकविषय महाराष्ट्र राज्य
अमरावती येथे1989 साली भरलेल्या ६२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दीक्षाभूमि नागपुर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती
नियुक्ति डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि व्याख्याने महाराष्ट्र विषयक महाराष्ट्र राज्य समितीचे उपाध्यक्ष
मुंबई व अन्यत्र झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शांतता आणि सादभाव निर्माण करण्याकरिता स्थापन झालेल्या राज्य शांतता समितीचे सभासद
२२ जून २००६ पासून १० जुलै २००८ पर्यन्त बिहारचे राज्यपाल
१० जुले २००८ ते ७ सप्टेंबर २०११ केरळ चे राज्यपाल
मृत्यू --. २५ जुलै २०१५