हुंड्याविरोधात संवेदनशील मने सरसावली!

By admin | Published: May 14, 2017 04:55 AM2017-05-14T04:55:59+5:302017-05-14T04:55:59+5:30

हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले.

Sense of sensitive minds against Dowry! | हुंड्याविरोधात संवेदनशील मने सरसावली!

हुंड्याविरोधात संवेदनशील मने सरसावली!

Next

राजकुमार जोंधळे,
लातूर- हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले. या घटनेने सर्वच स्तरातील संवेदनशील मनांच्या माणसांचे काळीज चिरले. शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ द्यायचीच नाही, असा निर्धार करीत लातूरकरांनी आता हुंड्याविरोधात एल्गार पुकारला आहे.
हुंड्यामुळे आपल्या जन्मदात्याला किती अपमान सहन करावा लागतोय. शिवाय हुंड्यामुळेच आपले लग्न होत नाही, या विवंचनेतून शीतलने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, मरणापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेने लातूरकरांना हुंडाविरोधी चळवळीसाठी प्रवृत्त केले. जिल्ह्याच नव्हे तर, महाराष्ट्रात शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता हुंडाविरोधी वधू-वर सूचक मंडळाची स्थापनाही केली आहे. या चळवळीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मंडळाच्या, चळवळीतील प्राचार्य संग्राम मोरे, सचिन इंगळे, सुमेधा इंगळे, अजय सूर्यवंशी, सुप्रिया सूर्यवंशी आदींसह इतर कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हुंडाविरोधी चळवळीला अधिक गती देण्याचाही प्रयत्न प्रा. संग्राम मोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘नो हुंडा डॉट कॉम’ या संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात आली आहे.
तरुणांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न...
हुंडाविरोधी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन, जागृती करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहोत, अशी माहिती प्रा. संग्राम मोरे यांनी दिली.

Web Title: Sense of sensitive minds against Dowry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.