सेन्सेक्स 348 अंकांनी घसरला
By admin | Published: July 12, 2014 01:24 AM2014-07-12T01:24:40+5:302014-07-12T01:24:40+5:30
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात उत्साहवर्धक असे काहीही नसल्यामुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरविली आहे.
Next
मुंबई : नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात उत्साहवर्धक असे काहीही नसल्यामुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरविली आहे. त्याचा परिणाम म्हणून आज शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 348 अंकांनी खाली आला. सेन्सेक्सने डिसेंबर 2क्11 नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदविली आहे.
गेल्या 4 सत्रंत सेन्सेक्सने 1,क्75.73 अंकांची घसरण नोंदविली आहे. हे नुकसान तब्बल 4.12 टक्के आहे. या चार दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांच्या भांडवलात 5 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. या सप्ताहाच्या काळात मुंबई शेअर बाजाराच्या मापदंडाने 937.71 अंक म्हणजेच 3.61 टक्के घसरण दर्शविली आहे.
3क् कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह 25,548.33 अंकावर उघडला. आयटी क्षेत्रतील आघाडीची कंपनी इन्फोसिसने पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळे सकाळची तेजी पाहायला मिळाली. मात्र, नंतर बाजारात नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्स 25 हजार अंकांच्या खाली 24,978.33 अंकांर्पयत घसरला. दिवसअखेरीस 348.4क् अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स 25,क्24.35 अंकावर
बंद झाला. ही घसरण 1.37 टक्के आहे.
निफ्टी 108 अंकांनी कोसळला
5क् कंपन्यांचा समावेश असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीचेही हेच हाल राहिले. 1क्8.15 अंकांनी म्हणजेच 1.43 टक्क्याने कोसळलेला निफ्टी 7,5क्क् अंकांच्या खाली येऊन 7,459.6क् अंकावर बंद झाला. सत्रदरम्यान तो 7,447.2क् ते 7,625.85 अंकांच्या मध्ये झुलत राहिला. या सप्ताहात निफ्टी 3.75 टक्क्यांनी म्हणजेच 292 अंकांनी कोसळला आहे. ही गेल्या 16 महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक घसरण आहे.
ब्रोकरांनी सांगितले की, नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाने निराशा केल्याने बाजाराच्या धारणोवर परिणाम झाला आहे. त्यातच पोतरुगालची सर्वात मोठी बँक ‘एस्पिरिटो सांतो’मध्ये रोकड संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून युरो झोनमध्ये पुन्हा एकदा कर्ज संकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम बाजार धारणोवर झाला आहे. रिअल्टी, भांडवली वस्तू, वीज, धातू, रिफायनरी, बँकिंग या क्षेत्रत मोठी घसरण पाहायला मिळाली.
जगभरातील बाजारांत आज संमिश्र कल पाहायला मिळाला. आशियाई बाजारातही संमिश्र कल होता. हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार क्.क्2 टक्के ते क्.72 टक्के कोसळले. चीन आणि सिंगापूर येथील बाजार क्.42 ते क्.74 टक्क्यांनी वर चढले. प्रारंभिक आकडेवारीनुसार युरोपातील शेअर बाजार तेजीत दिसत होते. (प्रतिनिधी)
4सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 3क् पैकी 21 कंपन्यांचे शेअर्स कोसळले. 9 कंपन्या तेवढय़ा लाभात राहिल्या. भेलचा शेअर सर्वाधिक 8.1क् टक्के कोसळला. हिंदाल्कोमध्ये 5.59 टक्के, एसबीआय 4.96 टक्के, एलअँडटी 4.89 टक्के, टाटा स्टील 4.क्1 टक्के, टाटा पॉवर 3.6क् टक्के, एचडीएफसी 3.17 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 3.13 टक्के घसरण पाहायला मिळाली.
4आयसीआयसीआय बँक, गेल इंडिया, अॅक्सिस बँक, कोल इंडिया, ओएनजीसी, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, एनटीपीसी आणि बजाज ऑटो या बडय़ा कंपन्यांचे शेअर्सही खाली आले. या उलट सनफार्मा, टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅब, हिंद युनिलिव्हर, विप्रो, आयटीसी आणि इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले.