संवेदनशील मतदार केंद्रांमध्ये दुपटीने वाढ

By admin | Published: October 13, 2014 11:11 PM2014-10-13T23:11:54+5:302014-10-13T23:11:54+5:30

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांकडून गैरप्रकार होऊ शकेल, अशा मतदार केंद्राची माहिती घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले होते.

Sensitive voting centers doubled | संवेदनशील मतदार केंद्रांमध्ये दुपटीने वाढ

संवेदनशील मतदार केंद्रांमध्ये दुपटीने वाढ

Next
पुणो : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांकडून गैरप्रकार होऊ शकेल, अशा मतदार केंद्राची माहिती घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले होते. त्याप्रमाणो उमेदवारांनी जिल्ह्यातील 167 मतदार केंद्राची यादी दिली आहे. त्यामुळे यंदा संवेदनशील मतदार केंद्रांच्या संख्येत लोकसभेपेक्षा दुपटीने वाढ होऊन त्यांची संख्या 281 वर पोहचली आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक व्यवस्थेची माहिती दिली. या वेळी पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त o्रीकांत पाठक उपस्थित होते.
एखाद्या उमेदवाराचे कोणत्या भागात प्राबल्य आहे, तो कुठे गडबड करू शकेल याची चांगली माहिती त्याच्या विरोधी उमेदवारास असू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संवेदनशील मतदारसंघांची यादी निश्चित करताना त्यांच्याकडून या मतदान केंद्राची यादी मागवून घ्यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार 167 मतदान केंद्रांची यादी उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आली आहे. यामुळे दादागिरी, झुंडशाही करण्याचा प्रयत्न करणा:या उमेदवारांवर एक चांगला वचक निर्माण होऊ शकणार आहे. पोलिसांच्या व मतदान केंद्रप्रमुखांना संवेदनशील वाटणा:या 114 मतदान केंद्रांची दुसरी यादी तयार करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
 
‘दंगेबाबूं’ वर विशेष लक्ष्य..
च्पुणो शहर पोलिसांचा आठ हजारांचा फौजफाटा आणि ग्रामीण पोलिसांचे साधारणपणो पाच हजार पोलिसांचे मनुष्यबळ मतदानाच्या दिवशी बंदोबस्तामध्ये तैनात असणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर, सह पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह ग्रामीणचे अधीक्षक मनोज लोहियांसोबतच सर्वच अतिवरिष्ठ व वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तामध्ये असणार आहेत. 
च्यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची असल्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. गेल्याच आठवडय़ात पोलिसांनी ‘दंगा काबू योजने’ ची रंगीत तालीमही घेतली होती. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नेमके काय करावे, याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. 
च्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे आणि सूचनांचे पालन उमेदवार व राजकीय कार्यकत्र्याकडून होते की नाही याकडेही पोलिसांना लक्ष द्यावे लागणार आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांमध्ये पोलिसांनी केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या जवानांसह दिमाखदार पथसंचलन केले.

 

Web Title: Sensitive voting centers doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.