गोव्यात लेट येणा-या सरकारी अधिका-यांना पाठवले घरी

By admin | Published: March 29, 2017 01:31 PM2017-03-29T13:31:54+5:302017-03-29T14:18:07+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सरकार स्थिरस्थावर होताच कार्यालयात उशिराने पोहोचणा-या सरकारी अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Sent the government officials lying in Goa | गोव्यात लेट येणा-या सरकारी अधिका-यांना पाठवले घरी

गोव्यात लेट येणा-या सरकारी अधिका-यांना पाठवले घरी

Next

 ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. 29 - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सरकार स्थिरस्थावर होताच कार्यालयात उशिराने पोहोचणा-या सरकारी अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मापूसातील सरकारी कार्यालयात उशिरा पोहचलेल्या 14 जिल्हस्तरीय अधिका-यांना गोव्याचे महसूल मंत्री रोहन खाऊंटे यांनी दोन दिवसांसाठी निलंबित केले. 
 
खाऊंटे यांनी बुधवारी उत्तर गोव्यातील मापूसा येथील सरकारी कार्यालयांना अचानक भेट दिली. यावेळी उशिराने पोहोचलेल्या 14 अधिका-यांना दोन दिवसांसाठी निलंबित केले. वाहतूक कोंडीमुळे 15 मिनिटे उशिर झाल्यास समजून घेता येईल पण त्यापेक्षा उशिर करणा-यांवर कारवाई केली असे खाऊंटे यांनी सांगितले. 
 
वेळेमध्ये सेवा देण्याचे आपण आश्वासन दिले आहे त्यामुळे सरकारी कर्मचा-यांनी वेळ पाळली पाहिजे असे खाऊंटे यांनी सांगितले. मूळचे उद्योगपती असलेले रोहन खाऊंटे उत्तर गोव्यातील पॉरवोरीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपाशासित राज्यांमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचा-यांना वेळेवर ऑफीसमध्ये पोहण्याचे आदेश आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुध्दा सरकारी अधिका-यांना वेळेवर कार्यालयात पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Web Title: Sent the government officials lying in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.