कुलभूषण जाधवांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक - सुभाष भामरे

By Admin | Published: April 14, 2017 06:45 PM2017-04-14T18:45:52+5:302017-04-14T18:49:40+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 14 - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून हा ...

The sentence awarded to Kulbhushan Jadhav is unjustified - Subhash Bhamre | कुलभूषण जाधवांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक - सुभाष भामरे

कुलभूषण जाधवांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक - सुभाष भामरे

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 14 - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून हा हत्येच्या नियोजनाचा प्रकार आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत पूर्णपणे निषेध करतो, भारताला शांतता हवी आहे. परंतु पाककडून अशाप्रकारचे कृत्य सुरूच राहणार असतील एका बाजुने शांततेचे प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे संपूर्ण देशभरात आक्रोश व्यक्त होत आहे. पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा जाहीर केल्यापासून भारत सरकार जाधव यांच्या सूटकेसाठी पाठपुरावा करीत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं, सांगत त्यांना सोडवण्यासाठी भारतसरकारते सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे भामरे यांनी यांनी स्पष्ट केले. ते नाशिक येथे म्हाडाच्या भूमिपूजन सोहळ््यानंतर बोलत होते. कुलभूषण जाधव रॉ एजंट नाही, त्यांची अटक चुकीची करण्यात आल्याचे सांगतानाच पाकिस्तानने या बाबतचे कोणतेही पुरावे दिलेले नाही. त्यामुळे कुलभषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अन्यायकारक असून भारत हे कदापी सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले.

https://www.dailymotion.com/video/x844vpa

Web Title: The sentence awarded to Kulbhushan Jadhav is unjustified - Subhash Bhamre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.