भगिनी बनल्या एकमेकींचा आधार !

By admin | Published: November 23, 2015 02:30 AM2015-11-23T02:30:42+5:302015-11-23T02:30:42+5:30

‘मालक वारले.. एक भाऊ.. पण तो त्याचेच पोट भरू शकत नाही. मूलबाळ नसल्याने आधाराची काठी नाही. जीवनाची संध्याकाळ अशी असेल, याची कल्पना असती तर तरुणपणीच विष घेऊन आत्महत्या केली असती.

Separate sisterhood formed! | भगिनी बनल्या एकमेकींचा आधार !

भगिनी बनल्या एकमेकींचा आधार !

Next

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)
‘मालक वारले.. एक भाऊ.. पण तो त्याचेच पोट भरू शकत नाही. मूलबाळ नसल्याने आधाराची काठी नाही. जीवनाची संध्याकाळ अशी असेल, याची कल्पना असती तर तरुणपणीच विष घेऊन आत्महत्या केली असती. परंतु आता तेही करू शकत नाही. आमचा शेवट परमेश्वर कधी करतो, याची आम्ही बहिणी वाट पाहत आहोत,’ श्रीगोंदा येथील सरुबाई आपली व्यथा मांडत होत्या.
श्रीगोंदा शहरातील सप्रेवाडी येथील सरुबाई अर्जुन मडके व सखुबाई अर्जुन मडके या दोन निराधार वृद्ध भगिनी एकमेकींच्या आधाराने राहात आहेत. सरुबाईचे वय ९० तर सखुबार्इंचे वय ८० आहे. अन्नासाठी जीवंतपणी नरकयातना भोगण्याची वेळ या दोन भगिनींवर आली आहे. पारगाव सुद्रिक येथील अर्जुन मडके यांच्याशी सरुबाई यांचा विवाह झाला. सरुबाईला मूलबाळ होत नाही म्हणून आई-वडिलांनी आपली दुसरी मुलगी सखुबाई व अर्जुनची जन्मभराची गाठ बांधली. नंतर सरुबाईला तीन मुले झाली, परंतु ती दगावली. आजारपणाच्या लढाईत मडके कुटुंबाची घरदार, जमीन गेली.
नंतर अर्जुन मडके यांनी आपल्या दोन्ही पत्नींसह श्रीगोंदा गाठले. १२ वर्षांपूर्वी अर्जुन मडकेंचे निधन झाले. सरुबाई व सखुबार्इंवर आभाळ कोसळले. सरुबाई सध्या अंथरुणावर पडून आहेत. सखुबाईला दोन घास मिळवण्यासाठी दारोदार धुणी-भांडी करावी लागत आहे. दोघी भगिनींचे हातपाय थकले. नजर कमी झाली आहे. पोटासाठी संघर्ष चालू आहे. काही दिवसांपूर्वी सरुबाई आजारी पडल्या, सखुबाईने हातापाया पडून डॉक्टरांचे बिल भरण्यासाठी दहा हजार जमा केले. आणि त्यांचे प्राण वाचले.

Web Title: Separate sisterhood formed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.