सैराट लीक, नागराज मंजुळेंची पोलिसात तक्रार
By admin | Published: May 4, 2016 12:13 PM2016-05-04T12:13:40+5:302016-05-04T13:40:02+5:30
झिंग झिंग 'झिंगाट' गाण्याने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणारा 'सैराट' सिनेमा पायरसीच्या दुष्टचक्रातून सुटू शकलेला नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - झिंग झिंग 'झिंगाट' गाण्याने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणारा 'सैराट' सिनेमा पायरसीच्या दुष्टचक्रातून सुटू शकलेला नाही. प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसात १५ कोटींचा टप्पा पार करणारा 'सैराट' सिनेमाची कॉपी यु ट्यूबवर लिक झाली आहे.
यू ट्यूबवर सेन्सॉर कॉपी अपलोड झाली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. सैराटमधील झिंगाट गाण्यांनी महाराष्ट्रातील तरुणाईवर गारुड केले असून, डिजे, लग्नसोहळयामध्ये हे गाणे सध्या तुफान गाजत आहे.
रिलीज झाल्यानंतर सैराटला पहिल्या तीन दिवसातच बंपर ओपनिंग मिळाले. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, लय भारी या चित्रपटांचा पहिल्या ३ दिवसातील तिकिट खिडकीवर कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढला. सैराट सिनेमाने ३ दिवसात १२ कोटींचा गल्ला जमवला.