महाराष्ट्रातील धरणे बांधली साखर कारखान्यांच्या सेवेसाठी
By admin | Published: April 27, 2016 02:02 AM2016-04-27T02:02:48+5:302016-04-27T02:02:48+5:30
महाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे, तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे, तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत, असा आरोप करून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारांवर जोरदार हल्लाबोल केला. या वेळी राज्यातील दुष्काळावर सभागृहात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून सत्तारूढ पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलेच वाक्युद्ध भडकले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या राजवटीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करताना राधामोहन सिंग म्हणाले, ‘मागील अनेक वर्षांपासून राज्यांना मनरेगा योजनेअंतर्गत उशिरा म्हणजे जुलै-आॅगस्टमध्ये निधी मिळत आला होता. परंतु रालोआ सरकारने अर्थसंकल्प मंजूर झाल्याच्या २४ तासांतच हा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.’
सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीवर विचारण्यात आलेल्या आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात कृषिमंत्री सिंग म्हणाले, असे तब्बल ८० सिंचन प्रकल्प मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. (पान ९ वर)