सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत राहील सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 09:03 AM2022-10-05T09:03:43+5:302022-10-05T09:05:00+5:30

हा सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

service fortnight will continue till November 5 instructions of cm eknath shinde | सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत राहील सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत राहील सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात १४ लाख ८६ हजार ९५९ तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. हा सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा पंधरवड्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत १० सप्टेंबरपर्यंतचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत आपले सरकार वेबपोर्टल, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र तसेच विभागांच्या वेबपोर्टलवर एकूण २३ लाख ७६ हजार ६३२ अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी १४ लाख ८६ हजार ९५९ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

नागरिकांच्या सर्वच तक्रार अर्जांचा निपटारा करण्यासाठी या सेवा पंधरवड्यास मुदतवाढ देऊन तो ५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: service fortnight will continue till November 5 instructions of cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.