सेवा दलाने साकारली 5क् फूट लांब ‘गांधी टोपी’
By admin | Published: October 1, 2014 01:43 AM2014-10-01T01:43:42+5:302014-10-01T01:43:42+5:30
शहर काँग्रेस सेवा दलाच्या जुन्या नाशकातील कार्यकत्र्यानी तब्बल तीन फूट रुंद व पन्नास फूट लांबीची कापडी गांधी टोपी साकारली आहे.
Next
>नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘गांधी टोपी’चा इतिहास आजच्या पिढीर्पयत पोहचविण्यासाठी शहर काँग्रेस सेवा दलाच्या जुन्या नाशकातील कार्यकत्र्यानी तब्बल तीन फूट रुंद व पन्नास फूट लांबीची कापडी गांधी टोपी साकारली आहे. या टोपीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये झाली असून,संस्थेकडून सेवा दलाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महत्मा गांधींच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबरला येथील महात्मा गांधी रस्त्यावर नाशिककरांसमोर टोपीचे सादरीकरण करण्यात येणार आहे, असे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी सांगितले. नाशिकमधील कारागीर रत्नाकर पंडित यांनी दहा मदतनीसांच्या मदतीने सलग पाच दिवस परिश्रम घेऊन तीन बाय पन्नास फुटाची टोपी तयार केली. या टोपीसाठी सुमारे 12क् मीटर कापड लागले. (प्रतिनिधी)