महामार्गावर अपघातांचे सत्र

By admin | Published: May 25, 2015 04:08 AM2015-05-25T04:08:50+5:302015-05-25T04:08:50+5:30

मुंबई - गोवा महामार्गासाठी रविवार हा घातवारच ठरला. मध्यरात्री वहूर गावाजवळ भरधाव मिनीबसच्या चालकाचे नियंत्रण सुटून ती झाडावर आदळल्याने झालेल्या

Session of accidents on the highway | महामार्गावर अपघातांचे सत्र

महामार्गावर अपघातांचे सत्र

Next

मुंबई : मुंबई - गोवा महामार्गासाठी रविवार हा घातवारच ठरला. मध्यरात्री वहूर गावाजवळ भरधाव मिनीबसच्या चालकाचे नियंत्रण सुटून ती झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर २३ जण गंभीर जखमी झाले. दुसऱ्या अपघातात पहाटे पेण येथील आंबिवली - गोर्विले फाट्यावर ट्रकला दिलेल्या धडकेत सिलिंडर भरलेल्या ट्रकने पेट घेतला.
या अपघातात सिलिंडरचे एकामागोमाग एक भीषण स्फोट झाले. यात एक महिला जखमी झाली. दरम्यान, आणखी एका अपघातात मुंब्रा बायपासमार्गे गुजरातहून तळोजाकडे चाललेल्या टँकरचा पेडल तुटल्याने वाहनचालकाचा ताबा सुटून अमोनिया रसायनाने भरलेला टँकर मुंब्रा बायपासजवळील नाल्यात कोसळला.
संगमेश्वर ते वसई नालासोपारा जाणारी प्रवासी मिनीबस महाड तालुक्यातील वहूर गावच्या हद्दीत रात्री २.१५ च्या सुमारास बस (एमएच ०४ एफके ८२) रस्त्याकडेच्या झाडावर धडकली. या अपघातात बसमधील श्रेयस सनगरे (१२, रा. नालासोपारा), नीलेश जांभळे (३२, रा. विरार) हे प्रवासी जागीच ठार झाले. तर बळवंत मोहिते (३४), रेखा मोहिते (३०), प्रज्वल मोहिते (३), अथर्व मोहिते (८), सर्व रा. गोवंडी, मुंबई, संजीवनी जाधव (३२), साक्षी जाधव (१३), स्वयंम जाधव (१०, रा. वांद्रे), नंदू गायकवाड (३८), सीमा गायकवाड (३४), सलोनी गायकवाड (१०), श्रेहान गायकवाड (११), सर्व रा. नालासोपारा, राजेश पडवळ (३५), जोत्स्ना पडवळ (३२), आर्यन पडवळ (५), मानसी पडवळ (१०) सर्व रा. शिवडी, विठ्ठल घडशी (५३, रा. नालासोपारा), कल्पना गमरे (५०, बांद्रा), रघुनाथ रहाटे (२६, रा. संगमेश्वर, रत्नागिरी), रामचंद्र कांबळे (५१, सांताक्रूझ), शर्वरी भानत (२२, रा. मुंबई), मीनाक्षी कांबळे (१६, रा. सांताक्रूझ), शिवाजी गमरे (२४, रा. नालासोपारा) असे २३ प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी झाले.
या सर्व जखमींना महाड ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १९ प्रवासी
गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर तात्पुरते उपचार करून मुंबई
केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. दोन प्रवासी ट्रॉमा केअरमध्ये तर दोन प्रवासी महाडमधील रानडे यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
अपघातानंतर महाड महामार्ग पोलीस व महाड शहर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या ठिकाणी रुग्णवाहिका एक तास उशिरा पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. या दरम्यान वहूर गावचे नागरिक व या मार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनातल्या प्रवाशांनी जखमींना खाजगी वाहनातून महाड येथे रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले. (प्रतिनिधी)

Web Title: Session of accidents on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.