राजनला ठेवण्यास २-३ ठिकाणे निश्चित

By admin | Published: November 4, 2015 03:08 AM2015-11-04T03:08:35+5:302015-11-04T03:08:35+5:30

कुख्यात डॉन छोटा राजनला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, हे निश्चित आहे. मात्र त्याला मुंबईत केव्हा आणले जाईल, याबाबत अद्यापही संभ्रम आहे, असे पोलीस आयुक्त अहमद जावेद

Set 2-3 places to keep Rajan | राजनला ठेवण्यास २-३ ठिकाणे निश्चित

राजनला ठेवण्यास २-३ ठिकाणे निश्चित

Next

मुंबई : कुख्यात डॉन छोटा राजनला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, हे निश्चित आहे. मात्र त्याला मुंबईत केव्हा आणले जाईल, याबाबत अद्यापही संभ्रम आहे, असे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले. छोटा राजनला ताब्यात देण्याचा निर्णय सीबीआयकडून होईल. त्यामुळे आता त्याबाबत काहीच सांगू शकत नसल्याचे त्यांनी मंगळवारी स्पष्ट केले. छोटा राजनला मुंबईत आणल्यानंतर सुरक्षितपणे ठेवण्यासाठी दोन, तीन ठिकाणे निश्चित केलेली आहेत,असेही जावेद यांनी सांगितले.
छोटा राजनला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीबीआय) पथक तीन दिवसांपूर्वी इंडोनेशियाला गेले आहे. त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याला सोमवारी मुंबईत आणले जाणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाल्याने पसरले. त्याबाबत चर्चा होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने ट्विट करुन याविषयी कोणतेही अधिकृत मत मांडलेले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, छोटा राजनविरुद्धच्या प्रमुख गुन्ह्यांची यादी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने तयार केली आहे. मंगळवारी ती आयुक्त व सहआयुक्तांकडे देण्यात आली. त्याआधारे तपास करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

कसाबच्या अंडासेलमध्ये छोेटा राजनचा मुक्काम?
छोटा राजनला मुंबईत आणण्याचा ‘मुहूर्त’
अद्याप निश्चित झाला नसला तरी त्याला डी गँगकडून असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेण्याबाबत पोलिसांनी पुरेपूर तयारी केली आहे.
‘२६/११’तील अतिरेकी अजमल कसाब याला आर्थर रोड जेलमधील ज्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते तेथेच राजनला ठेवण्यात येईल, अशी खात्रीशीर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून
देण्यात आली.
अंडासेलबरोबरच अन्य दोन ठिकाणांचाही विचार करण्यात आलेला आहे. छोटा राजनला पोलीस कोठडी असेपर्यंत आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कक्ष-१
च्या लॉकअप्मध्ये ठेवले जाऊ शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Set 2-3 places to keep Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.