‘संकेतस्थळांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ’

By admin | Published: May 5, 2014 01:13 PM2014-05-05T13:13:36+5:302014-05-06T15:42:48+5:30

प्रशासनात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी तसेच प्रशासकीय माहिती जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक विभागांची संकेतस्थळे उपलब्ध आहेत.

'Setting up independent machinery for websites' | ‘संकेतस्थळांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ’

‘संकेतस्थळांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ’

Next

मुंबई : प्रशासनात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी तसेच प्रशासकीय माहिती जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक विभागांची संकेतस्थळे उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवली जाते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 
ई-प्रशासन पुरस्कार वितरण सोहळा २0१३ आणि नवीन माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असून शासकीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. ई-दहशतवाद, सायबर गुन्ह्याचे प्रमाण आता वाढले आहे. त्यामुळे अनेकदा तणावाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Setting up independent machinery for websites'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.