सात एकरावरील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 05:20 PM2017-07-19T17:20:25+5:302017-07-19T17:20:25+5:30

एका शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

Seven acres rotated on the soybean tractor | सात एकरावरील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

सात एकरावरील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
बोरखेड, दि. 19 - संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात शेत असलेल्या एका शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिसरात पाऊस लांबत असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, सायखेड, पिंगळी, वारखेड, सगोडा, पळसोडा, दानापूर या गावात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे अखेर जास्तीत जास्त दुबार तिबार पेरणी करण्याचे संकट कोरडवाहू शेतकऱ्यांवर येवून ठेपले आहे. तसेच काही शेतकऱ्यांची प्रथम पेरणी करण्याचे सुध्दा बाकी आहे. पुढील घर खर्च व मुलांचे शिक्षण, लग्न, कसे काय भागवावे. अशा विविध संकटात कोरडवाहू शेतकरी अडकला असतानाच, बोरखेड गावालगत गट ५३ मध्ये गोपाल व्यास या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

या शेतकऱ्याने २० जून रोजी शेतात सोयाबीनची पेरणी केली. मात्र पावसाने लांब दडी मारल्याने त्यातील बरेच बियाणे जमिनीच्या आत खराब झाले. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सोयाबीन निघेल या आशेने ते थांबले. अखेर १२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पावसाचे थोडे आगमन झाले. परिणामी शेतात जास्तीत जास्त सोयाबीन निघेल अशी आशा त्यांना होती. मात्र, १८ जुलै रोजी शेतात फेरफटका मारला असता शेतात फक्त २० टक्के सोयाबीन पीक उगवले, ताबडतोब त्यांनी दुसरे पिक घेण्याकरीता सात एकरातील सोयाबीनवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवला त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच या परिसरात दुबार तिबार पेरणी करूनही योग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. महसूल विभागाने दुबार, तिबार पेरणी केलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची यादी सरसकट तयार करून त्वरीत शासनाकडून मदत मिळण्याची मागणी कोरडवाहू शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

Web Title: Seven acres rotated on the soybean tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.