राज्यात सात शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले
By admin | Published: December 14, 2014 01:22 AM2014-12-14T01:22:30+5:302014-12-14T01:22:30+5:30
नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली.
Next
औरंगाबाद/नगर/बुलडाणा : नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली. तर अहमदनगर जिलतील पारनेर तालुक्यात एका शेतक:याने मृत्यूला कवटाळल़े
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथील रमेश काकासाहेब जगताप (25 ) या शेतक:याने नापिकीला कंटाळून 1क् डिसेंबरला विषारी द्रव प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पांगरी येथील लक्ष्मण किशनराव पवार (42 ) या शेतक:याने 13 डिसेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आह़े धर्माबाद तालुक्यात आतार्पयत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत़
परभणी जिलत पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील शेतकरी नारायण गुणाजी शिराळे (3क्) यांनी 12 डिसेंबर रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिराळे यांना 8 एकर जमीन आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होत़े अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथे हरिभाऊ गणपत झावरे (65) यांनी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ झावरे यांना सात एकर जमीन होती़ मात्र, पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावरच पीक थोडेफार निघायच़े शेती बागायती करण्यासाठी झावरे यांनी सेवा सोसायटी, पतसंस्था व बँकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होत़े त्यांच्यामागे एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. बुलडाणा जिलतील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश शंकरलाल जैस्वाल (38) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून 13 डिसेंबर रोजी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.
त्यांच्याकडे 2 हेक्टर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँकेचे 2क् हजार रूपयांचे कर्ज होते. या विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव सेवन केल़े त्यांना बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यशी झुंज दिल्यानंतर 13 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात प}ी, तीन मुली व मोठा परिवार आह़े
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील भिवापूर येथेशेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन जगन किसनराव चव्हाण (58) यांनी आत्महत्या केली. ही घटना शनिवार 13 डिसेंबर रोजी उघडकीस आली. अवघी दीड एकर शेती, त्यावर बँकांचे कजर्, खासगी सावकारांचे कजर्. त्यांनी 1क् एकर शेती मक्त्याने घेतली होती. यासाठी इंडीयन बँकेचे 5क् हजार कर्ज काढले. खासगी सावकारांचे कर्ज होतेच. (प्रतिनिधी)
यवतमाळ जिलतील वणी तालुक्यातील साखरा (दरा) येथील शंकर उद्धव चौधरी या (38)शेतक:याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शंकरने 10 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी कुणीच नसल्याचे बघून विष प्राशन केले. याबाबत माहिती मिळताच त्यांना कुटुंबीयांनी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.