सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 22:16 IST2024-12-31T22:15:18+5:302024-12-31T22:16:36+5:30
नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले असून, दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील सात अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. या संदर्भातील आदेशही काढण्यात आले असून, दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी रुचेश जयवंशी आणि अशोक करंजकर यांची पदोन्नतीसह बदली करण्यात आहे.
प्रमोशन अर्थात पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये रुचेश जयवंशी, सोनिया सेठी, निधी चौधरी, शीतल तेली-उगले, अशोक करंजकर, रावसाहेब भागडे, विमला आर यांचा समावेश आहे.
महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्या पदाची श्रेणी पदोन्नतीमुळे वाढवण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची पदोन्नतीनंतर अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या पण सध्या केंद्र सरकारमध्ये डेप्युटेशनवर असलेल्या निधी चौधरी यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांची पदोन्नती करण्यात आली असून, आयुक्त पदाची श्रेणी वाढवण्यात आली आहे.
अशोक करंजकर यांची पदोन्नतीनंतर राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.