द्रुतगती मार्गावर अपघातात सात जखमी
By admin | Published: August 27, 2016 02:18 AM2016-08-27T02:18:07+5:302016-08-27T02:18:07+5:30
कळंबोली सर्कलजवळ द्रुतगती मार्गावर इनोव्हा कारला शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात सहा जणांसह एक पादचारी गंभीर जखमी झाला.
पनवेल : कळंबोली सर्कलजवळ द्रुतगती मार्गावर इनोव्हा कारला शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात सहा जणांसह एक पादचारी गंभीर जखमी झाला. जखमींना एम.जी.एम. रु ग्णालयात दाखल केले आहे.
मालाड येथील शराफ महाविद्यालयाचे बी.एम.एम.चे सहा विद्यार्थी लोणावळा येथे सहलीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजता ते लोणावळा येथून इनोव्हा कारने (एमएच०४ डीडब्ल्यू १८२०) मुंबईला येत होते. २.४५ वाजता कळंबोली सर्कलजवळ आले असता पावसामुळे काचेवर धुके आले होते. चालक तमन्ना मलबरी (१९) हिला रस्त्यावरील दुभाजक न दिसल्याने तिने गाडी अचानक वळवली. यामुळे झालेल्या अपघातात कारमधील सहा जण व एक पादचारी गंभीर जखमी झाला. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात तमन्ना मलबरीसह, शेलोंग क्रियाडो, काजल ललानी, रौनक चामरिया, जान्हवी भट्ट व आशिष कनौजिया जखमी झाले. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
(वार्ताहर)