पैशांचा पाऊस पडण्याचे अमिष दाखवून पुण्यातील दोन महिलांना घातला सात लाखांचा गंडा
By Admin | Published: April 25, 2017 12:28 AM2017-04-25T00:28:01+5:302017-04-25T00:28:01+5:30
पैशांचा पाऊस पडून रक्कम दुप्पट करण्याचे अमिष दाखवून भामट्यांनी पुण्यातील दोन महिलांना सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 25 - पैशांचा पाऊस पडून रक्कम दुप्पट करण्याचे अमिष दाखवून भामट्यांनी पुण्यातील दोन महिलांना सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला असून या प्रकरणी जिंसी पोलीस ठाण्यात भांत्यांच्या टोळी विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि,पुणे परिसरातील मोर्शी येथे राहणाऱ्या मनीषा दुजकार यांच्याकडे काम करणारी मोलकरणी संगीत गजानन लोखंडे हिने मनीषाला सांगितले कि एक बाबा पैसे दुप्पट करून देतो. त्याने अनेकांना पक्ष्यांचे पाऊस पडून काही तासातच पैसे दुप्पट करून दिले. आपण त्याची भेट घेऊ आसा सल्ला दिला. काही तासात पैसे दुप्पट होतायत म्हणून खात्री करण्यासाठी मनीषा आणि संगीता ह्या दोघी बाबाच्या सांगण्या प्रमाणे अकोला जिल्ह्यातील पाचूड या गावात गेल्या तेथे एका झोपडीत बाबा आणि चार पुरुष तसेच दोन महिला बसल्या होत्या.मंत्रोउपचार करून त्या बाबाने 500 च्या नोटांचा पाऊस पडला आणि त्या रक्कममधून मनीषा आणि सांगितला दिले. त्यामुळे दोघींचा विश्वास बसला . आम्ही पुण्याहून रक्कम घेऊन येतो म्हणून दोघी पुण्याला परतल्या मनीषाने सहा लाख पन्नास हजार आणि संगीताने 50 हजारांची रक्कम जमवली . रक्कम जमल्यानंतर बाबाने हे पैसे औरंगाबाद येथील कटकटगेट परिसरात मागविले. बाबा सोबत आलेल्या एका तरुणाला हि रक्कम देण्याचे सांगितले.रक्कम घेऊन तो तरुण पुढे गेला. नंतर बाबाने त्याला मी बोलून आणतो असे सांगून पोबारा केला महिला त्या बाबाची वाट पाहत बसल्या.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनीषा यांनी जिंसी पोलीस ठाणे गाठून त्या टोळी विरोधात गुन्हा दाखल केला.