शरद पवारांसह सात जण राज्यसभेवर बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:07 AM2020-03-17T05:07:18+5:302020-03-17T05:07:43+5:30

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठीची ही निवडणूक होती.

Seven members, including Sharad Pawar, unopposed Electied in Rajya Sabha | शरद पवारांसह सात जण राज्यसभेवर बिनविरोध

शरद पवारांसह सात जण राज्यसभेवर बिनविरोध

googlenewsNext


मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सात जणांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड निश्चित झाली आहे. आठवा अर्ज त्रुटींमुळे मंगळवारी फेटाळण्यात आला.
शरद पवार, फौजिया खान (राष्ट्रवादी), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले आणि औरंगाबादचे डॉ.भागवत कराड (भाजप), राजीव सातव (काँग्रेस) आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीच्या घोषणेची औपचारिकता आता बाकी आहे.
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठीची ही निवडणूक होती. किशोर चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी आठवे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. छाननीमध्ये सोमवारी तो रद्द ठरविण्यात आला. ही निवडणूक २६ मार्चला होणार होती पण आता सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने ती बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबाबत उत्सुकता असेल. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर
निवडून जातील, हे जवळपास निश्चित आहे.

Web Title: Seven members, including Sharad Pawar, unopposed Electied in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.