ट्रक-कारच्या भीषण अपघातातून बचावली सात महिन्यांची चिमुकली
By admin | Published: March 27, 2017 07:21 AM2017-03-27T07:21:58+5:302017-03-27T10:11:04+5:30
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा एखाद्या भीषण अपघातात 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा आपल्याला प्रत्यय येतो.
Next
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 - नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा एखाद्या भीषण अपघातात 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा आपल्याला प्रत्यय येतो. अशा प्रसंगात एखाद्या व्यक्तीच्या बचावण्याने आपण थक्क होऊन जातो. हे कसे शक्य आहे ?, हा दैवी चमत्कार असल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. अगदी अशीच घटना सोमवारी जळगावमध्ये घडली.
आशिया महामार्ग 45 वर वरणगाव नजीक जाडगाव फाटयाजवळ ट्रक व इंडिका कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. आश्चर्य म्हणजे या अपघातात कारमधून प्रवास करणारी एक सात महिन्याची चिमुकली बचावली.
अपघातातील परिवार जळगाव येथे रहाणारा आहे. ही घटना पहाटे सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. चालक भगत, गणेश फुलपगारे अशी मयताची नावे आहेत. प्रथमेश फुलपगारे, सीमा भगत, गिरीश तायडे, शामा सोनवणे हे गंभीर जखमी असून त्यांना जळगाव सिव्हिलमध्ये हलविण्यात आले आहे.